शासनाच्या निषेधार्थ मानेंनी केले मुंडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 04:27 AM2017-12-25T04:27:16+5:302017-12-25T04:27:16+5:30

Believed to protest against the government, | शासनाच्या निषेधार्थ मानेंनी केले मुंडण

शासनाच्या निषेधार्थ मानेंनी केले मुंडण

Next

सातारा : भटके विमुक्त, धनगर, वंजारी व विशेष मागास प्रवर्ग यांचा समावेश अनुसूचित जमातीत करा, यासह अन्य मागण्यांसाठी ‘उपरा’कार लक्ष्मण माने तसेच ओबीसी संघटनेचे अध्यक्ष नेताजी गुरव यांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडण करून शासनाचा निषेध केला.
गेल्या दोन दिवसांपासून लक्ष्मण माने हे आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषणास बसले आहेत. मात्र, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल व पोलिस प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे लक्ष्मण माने आणि नेताजी गुरव यांनी रविवारी सायंकाळी मुंडण आंदोलन करून शासनाचा निषेध केला. शासकीय नोकर भरती तत्काळ सुरू करावी, सरकारी नोकरांच्या पेन्शन २००५पासून सर्वांना सुरू करा, किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी खासगीकरण केलेल्या सर्व उद्योगधंद्यांना, सेवा उद्योगांना लागू करा, खासगी सेवा उद्योगातील कर्मचाºयांना कायद्याने संरक्षण द्या, अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त जमाती, विशेष प्रवर्ग या सर्वांचा बॅकलॉग तत्काळ भरा, खासगीकरण, उदारीकरण बंद करा, मागण्यांसाठी त्यांचे आंदोलन आहे़

Web Title: Believed to protest against the government,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.