बेड मारणारे यंत्र केले तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 11:19 AM2018-10-06T11:19:56+5:302018-10-06T11:20:08+5:30

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथील अनिकेत देशमुख या शेतकऱ्याने हळद, ऊस व केळी पिकाला माती लावण्यासाठी बेड यंत्र तयार करून कमी खर्चात भरघोस उत्पन्न मिळविले आहे.

Bedding maker made ready | बेड मारणारे यंत्र केले तयार

बेड मारणारे यंत्र केले तयार

googlenewsNext

युनूस नदाफ, (पार्डी, ता. अर्धापूर)

आजच्या घडीला तरुण शेतकरीशेतीकडे वळला असून, शेती करताना सतत नवनवीन प्रयोग करण्याची जिद्द, या जोरावर त्यांनी विविध यंत्र विकसित केले आहेत. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथील अनिकेत देशमुख या शेतकऱ्याने हळद, ऊस व केळी पिकाला माती लावण्यासाठी बेड यंत्र तयार करून कमी खर्चात भरघोस उत्पन्न मिळविले आहे. त्यांनी आपला अािर्थक नफा वाढविण्यास सुरुवातही केली आहे. इतर शेतकºयांपुढे त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.


देशमुख यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती करून शेती नुकसानीची नाही, तर फायद्याचीच आहे, हे दाखवून दिले. बाजारात अवजारांची भरमसाठ किंमत असल्याने ते परवडणारे नाही, हे लक्षात घेऊन देशमुख यांनी आपल्याच शेतात वेगळे उपकरण बनविण्याचा ध्यास घेतला.

मजुरांचे वाढते दर, त्यांची हांजी हांजी करण्याची गरज पडणार नाही, हा निश्चय करून त्यांनी बेड मारण्याचे यंत्र विकसित करण्याचे ठरविले. यंत्र तयार करताना त्यांना वेल्डिंग वर्कशॉपची मदत घ्यावी लागली. हळद, केळी, पपई, कांदा, सोयाबीन बेडवर लावण्यासाठी या यंत्राची मदत होते. यंत्राच्या साहाय्याने तीन, चार, पाच, सात
फुटांपर्यंत लावलेल्या पिकामध्ये बेड माती ओढण्यात येते. या यंत्राची साईज कमी-जास्तही करता येते, तसेच फळ्या काढून टाकल्या तर नांगर तयार होतो.

यंत्राचे वजन कमी असल्याने बैलांना ओढताना जास्त ताण येत नाही, तसेच हळद पिकात तण वाढले, तर या यंत्राचा उपयोग करून हळदीतील तणही काढता येते. त्याचबरोबर हळदीला मातीपण लावता येते. शिवाय उसात सरी पाडणे, हळदीचे बेड मारणे, कांदा बेड तयार करणे आदी कामांसाठीही या यंत्राचा उपयोग होतो. दरम्यान, हे यंत्र पाहण्यासाठी पार्डी परिसरातील शेतकरी गर्दी करीत आहेत.

 

Web Title: Bedding maker made ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.