बाप्पा मोरया... 'हे' आहेत पुढचे २० अंगारक योग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2018 07:20 PM2018-04-03T19:20:28+5:302018-04-03T19:20:28+5:30

आज नूतन वर्षातील पहिली अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे. सन २०१८ मध्ये एकूण तीन अंगारकी संकष्ट चतुर्थी येत असल्याची माहिती पंचांगकर्ते , खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

Bappa Moraya ... 'These' are the next 20 Angkor Yoga | बाप्पा मोरया... 'हे' आहेत पुढचे २० अंगारक योग

बाप्पा मोरया... 'हे' आहेत पुढचे २० अंगारक योग

Next

मुंबई : आज नूतन वर्षातील पहिली अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे. सन २०१८ मध्ये एकूण तीन अंगारकी संकष्ट चतुर्थी येत असल्याची माहिती पंचांगकर्ते , खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. या विषयी अधिक माहिती सांगताना श्री. सोमण म्हणाले, चांद्रमहिन्याच्या कृष्ण पक्षात चंद्रोदयाच्या वेळी चतुर्थी असेल तो दिवस संकष्ट चतुर्थीचा मानला जातो. जर संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली तर तो दिवस  ‘ अंगारकी संकष्ट चतुर्थीचा ‘ दिवस मानला जातो. गणेश उपासकांच्या दृष्टीने अंगारकी संकष्ट चतुर्थीचा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदय झाल्यावर भोजन करतात.
दरवर्षी साधारणत: एक किंवा दोन अंगारकी संकष्ट चतुर्थीचे दिवस असतात. परंतु या वर्षी दि. ३ एप्रिल, दि. ३१ जुलै आणि दि. २५ डिसेंबर असे तीन अंगारकी संकष्ट चतुर्थीचे योग आले असल्याचेही श्री. दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
श्री. दा. कृ. सोमण यांनी आजच्या पुढील वीस अंगारकी संकष्ट चतुर्थीचे दिवस दिले आहेत (.१) दि. ३१ जुलै २०१८ (२) दि, २५ डिसेंबर २०१८ (३) दि, १७ डिसेंबर २०१९ (४) दि. २ मार्च २०२१ (५) २७ जुलै २०२१ (६) दि. २३ नोव्हेंबर २०२१( ७) १९ एप्रिल २०२२ (८) दि.१३ सप्टेंबर २०२२ (९) १० जानेवारी २०२३ (१० ) दि. २५ जून २०२४ (११) दि. १२ आगस्ट २०२५ (१२) दि. ६ जानेवारी २०२६ (१३) दि. ५ मे २०२६ (१४) दि. २९ सप्टेंबर २०२६ (१५) दि. २२ जून २०२७ (१६) दि, ८ आगस्ट २०२८ (१७) दि. ५ डिसेंबर २०२८ (१८) दि. १ मे २०२९ (१९) दि. २२ जानेवारी २०३० (२०) दि. १८ जून २०३० .

Web Title: Bappa Moraya ... 'These' are the next 20 Angkor Yoga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.