वर्तमानासोबत आता भविष्यही सांगणार ‘लोकमत’,astro.lokmat.com वेबसाइट आज होणार लाँच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 04:41 AM2018-05-11T04:41:56+5:302018-05-11T04:41:56+5:30

देश-विदेशातील आणि महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी झटपट आपल्यापर्यंत पोहोचवणारं ‘लोकमत डॉट कॉम’ आता वाचकांना ‘कल की बात’ सांगण्यासाठी सज्ज झालं आहे. म्हणजेच, वर्तमानाबद्दल आपल्याला अपडेट ठेवतानाच आम्ही तुम्हाला भविष्यातील घटनांबाबतही सूचित करणार आहोत.

astro.lokmat.com website will be launched today | वर्तमानासोबत आता भविष्यही सांगणार ‘लोकमत’,astro.lokmat.com वेबसाइट आज होणार लाँच

वर्तमानासोबत आता भविष्यही सांगणार ‘लोकमत’,astro.lokmat.com वेबसाइट आज होणार लाँच

googlenewsNext

 मुंबई : देश-विदेशातील आणि महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी झटपट आपल्यापर्यंत पोहोचवणारं ‘लोकमत डॉट कॉम’ आता वाचकांना ‘कल की बात’ सांगण्यासाठी सज्ज झालं आहे. म्हणजेच, वर्तमानाबद्दल आपल्याला अपडेट ठेवतानाच आम्ही तुम्हाला भविष्यातील घटनांबाबतही सूचित करणार आहोत. astro.lokmat.com ही आमची नवीकोरी वेबसाइट आज लाँच होत आहे. त्यानिमित्त, दुपारी ३ वाजता प्रसिद्ध ज्योतिषी सिद्धार्थ जानी आणि धर्मेश जोशी ‘लोकमत’च्या ‘फेसबुक पेज’वरून आपल्या प्रश्नांना ‘लाइव्ह’ उत्तरं देणार आहेत. अभिनेता समीर धर्माधिकारी आणि अभिनेत्री नेहा जोशी त्यांच्याशी संवाद साधतील.
आपलं ग्रहमान कसं आहे, कुठल्या ग्रहाची कृपादृष्टी आपल्या राशीवर आहे आणि कोणता ग्रह वक्री आहे, त्याचे काय परिणाम होऊ शकतात, हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. गुरू ग्रहाबद्दलचा आदर आणि शनिबद्दलची भीती सर्वश्रुतच आहे. हे ग्रह आपल्या कुंडलीत कुठे आहेत, यावर बरंच काही ठरत असतं,
असं ज्योतिष अभ्यासकांचं मत आहे. त्यामुळे या ग्रहांबद्दलचे अपडेट्स घेण्यासाठी श्रद्धाळू मंडळी विश्वासू, जाणकार ज्योतिषांच्या शोधात असतात.
पण, astro.lokmat.com वेबसाइटवरून त्यांना घरबसल्या, एका फोनवर आपल्या राशिभविष्याबद्दल खात्रीलायक माहिती मिळू शकेल.
आपली जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण कळवल्यास आपल्याला या वेबसाइटवरून
मोफत कुंडली बनवून मिळेल. त्यासोबतच, दैनंदिन, मासिक
आणि वार्षिक राशिभविष्यही ंastro.lokmat.comवर उपलब्ध आहे. कुठल्या राशीच्या व्यक्तींनी कुठलं रत्न वापरावं, त्याची सत्यता कशी पडताळून बघावी, याबाबतची परिपूर्ण माहिती वेबसाइटवर मिळेल.
महाराष्ट्रातील अव्वल क्रमांकाचा वृत्तसमूह असलेला ‘लोकमत’ आपल्या विश्वासार्हतेसाठी ओळखला जातो. astro.lokmat.com ही साइटही आपल्या विश्वासास पात्र ठरेल, याबद्दल आम्हाला खात्री वाटते. powered by ganeshaspeaks.com

Web Title: astro.lokmat.com website will be launched today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.