दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 05:17 PM2018-10-05T17:17:24+5:302018-10-05T18:42:48+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.

Announcing a schedule of SSC and twelth examinations | दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

Next
ठळक मुद्देदहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१९ या कालावधीतबारावीची लेखी परीक्षा १ मार्च ते २२ मार्च २०१९ या कालावधीमध्ये होणार सोशल मिडीयावरून प्रसारीत झालेले वेळापत्रकावर विद्यार्थ्यांनी ग्राहय धरू नये

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. दहावीची लेखी परीक्षा १ मार्च ते २२ मार्च २०१९ या कालावधीमध्ये पार पडेल तर बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च  २०१९ या कालावधीमध्ये होणार आहे अशी माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आली आहे.
शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील दहावी व बारावीचे विद्यार्थी, शिक्षक यांना अभ्यासाचे नियोजन करणे सोपे जावे. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी व्हावा यादृष्टिने संभाव्य वेळापत्रक राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आल्याची माहिती सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली. मंडळाकडून संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले वेळापत्रक हे संभाव्य आहे, परीक्षेपूर्वी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना मंडळांकडून जे छापील वेळापत्रक पाठविले जाईल ते अंतिम असेल. विद्यार्थ्यांनी छापील वेळापत्रकानुसार परीक्षेच्या तारखांची खात्री करून घेणे आवश्यक आहे. इतर क्लासेस यांनी छपाई केलेले, सोशल मिडीयावरून प्रसारीत झालेले वेळापत्रकावर विद्यार्थ्यांनी ग्राहय धरू नये असे आवाहन भोसले यांनी केले आहे. 
प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा यांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा व महाविद्यालयांना कळविले जाणार आहे. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून १० वी करिता पुनर्रचित अभ्यासक्रम असल्याने पुनपर्रपरीक्षार्थ्यांकरीता अंतिम संधी असलेल्या जुन्या अभ्यासक्रमांचे स्वतंत्र वेळापत्रक तयार करण्यात आले आहे असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. .

Web Title: Announcing a schedule of SSC and twelth examinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा