अण्णा हजारे करणार मोदींविरोधात आंदोलन, आज दिल्लीत घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 04:10 AM2017-10-02T04:10:49+5:302017-10-02T04:11:18+5:30

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सोमवारी सकाळी दिल्लीत राजघाटावर महात्मा गांधी यांच्या प्रेरणास्थळावर जाऊन दर्शन घेणार आहेत.

Anna Hazare to campaign against Modi, today's announcement in Delhi | अण्णा हजारे करणार मोदींविरोधात आंदोलन, आज दिल्लीत घोषणा

अण्णा हजारे करणार मोदींविरोधात आंदोलन, आज दिल्लीत घोषणा

Next

पारनेर (जि. अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सोमवारी सकाळी दिल्लीत राजघाटावर महात्मा गांधी यांच्या प्रेरणास्थळावर जाऊन दर्शन घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकपाल व स्वामीनाथन आयोगाकडे दुर्लक्ष केल्याने अण्णा तेथे आंदोलनाची घोषणा करणार आहेत़
अण्णांनी तीन वर्षांपासून पंतप्रधानांना सातत्याने पत्र पाठवून लोकपाल कायद्याची अंमलबजावणी व शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी मागणी करीत आहेत़ पंतप्रधान कार्यालयाकडून फक्त कार्यवाही सुरू असल्याचे त्रोटक उत्तर देण्यात येत आहे़ पंतप्रधानांचे भाषण व कृती वेगळी आहे, अशी टीकाही अण्णांनी सातत्याने केली आहे. मोदींना गैरप्रकार थांबवायचेच नाहीत, असा अर्थ यातून निघत असल्याचा आरोपही अण्णांनी केला होता़
अण्णा हे प्रेरणास्थळी चिंतन करतील. त्यानंतर ते लोकपाल व शेतकºयांना वरदान ठरणाºया स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, अशी मागणी करणार आहेत़

Web Title: Anna Hazare to campaign against Modi, today's announcement in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.