अनिकेत कोथळे हत्या प्रकरण- अनिकेतच्या दोन्ही भावांचा अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 01:17 PM2017-11-28T13:17:32+5:302017-11-28T13:52:41+5:30

सीआयडी तपासातून काहीही निष्पन्न होत नसल्याचा आरोप करत अनिकेत कोथळेच्या दोन्ही भावांनी मंगळवारी दुपारी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

Aniket Kothale murder case: Aniket's brothers try to burn themselves with kerosene | अनिकेत कोथळे हत्या प्रकरण- अनिकेतच्या दोन्ही भावांचा अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

अनिकेत कोथळे हत्या प्रकरण- अनिकेतच्या दोन्ही भावांचा अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

Next

सांगली- सांगलीमध्ये घडलेल्या अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाला पंधरा दिवस उलटून गेले आहेत. सीआयडीकडून या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. पण सीआयडी तपासातून काहीही निष्पन्न होत नसल्याचा आरोप करत अनिकेत कोथळेच्या दोन्ही भावांनी मंगळवारी दुपारी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. सांगली पोलीस स्टेशनच्या आवारात या दोघांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतलं. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अनिकेत कोथळे खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा या मागणीसाठी त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.  आशिष कोथळेआणि अमित कोथळे अशी या दोघांची नाव आहेत. 

मंगळवारी सकाळी अनिकेतचे दोन्ही भाऊ तपासाबद्दल विचारणा करायला पोलीस स्टेशनमध्ये गेले होते पण पोलिसांनी योग्य उत्तर न दिल्याने त्यांचा उद्रेक होऊन त्या दोघांनी अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतलं आहे. अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून तपास सुरू आहे पण त्या तपासावर अनिकेतच्या कुटुंबियांनी आक्षेप घेतला असून तपासातून काहीही निष्पन्न होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 
 

सांगलीच्या पोलीस अधिक्षक, उपअधीक्षकांची अखेर बदली 

अनिकेत कोथळे हत्या प्रकरणी सांगलीचे पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे आणि उपअधिक्षक डॉ. दीपाली काळे यांची अखेर बद्दली बदली करण्यात आली. अनिकेत कोथळे हत्या प्रकरणी या दोघांची चौकशी सुरू होती. राज्याच्या गृह विभागाच्या निर्णयानंतर बदल्यांचे आदेश जारी केले होते.  जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची नागपूरला, तर सांगली शहर विभागाच्या पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांची सोलापूरला बदली करण्यात आली. 

नेमकं प्रकरण काय ?

सांगली शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत दि. ६ रोजी पोलिसांच्या मारहाणीत लूटमारीच्या गुन्ह्यातील अनिकेत कोथळे या संशयिताचा मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांनी सराईत गुन्हेगाराप्रमाणे त्यास नग्न करुन उलटे टांगले व मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याप्रकरणी सर्व पोलिसांना अटक करून सेवेतून बडतर्फ केले आहे. हा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे.

Web Title: Aniket Kothale murder case: Aniket's brothers try to burn themselves with kerosene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.