आधीच आॅक्टोबर हीट, त्यात वीज गूल; भारनियमन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 04:13 AM2018-10-09T04:13:57+5:302018-10-09T04:14:13+5:30

आॅक्टोबर हिटमुळे वाढलेली विजेची मागणी, कोळशाचा तुटवडा आणि पाण्याची पातळी खालावल्याने कोयना जलविद्युत प्रकल्पावर आलेली बंधने यामुळे वीजनिर्मिती आणि मागणीमध्ये पाच हजार मेगावॅटचा फरक पडला आहे.

Already the October heat, the power off; load-shedding | आधीच आॅक्टोबर हीट, त्यात वीज गूल; भारनियमन सुरू

आधीच आॅक्टोबर हीट, त्यात वीज गूल; भारनियमन सुरू

Next

रत्नागिरी : आॅक्टोबर हिटमुळे वाढलेली विजेची मागणी, कोळशाचा तुटवडा आणि पाण्याची पातळी खालावल्याने कोयना जलविद्युत प्रकल्पावर आलेली बंधने यामुळे वीजनिर्मिती आणि मागणीमध्ये पाच हजार मेगावॅटचा फरक पडला आहे. त्यामुळे सोमवारपासून काही ठिकाणी भारनियमनाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. कोळशाचा तुटवडा जाणवत असल्याने भारनियमनाचा प्रश्न इथूनपुढे आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
राज्यात सोमवारी १९ हजार ९९६ मेगावॅट विजेची मागणी होती. महावितरणकडून १४ हजार ८७० मेगावॅट विजेची उपलब्धता करण्यात आली. आॅक्टोबर हिटमुळे घरगुती, वाणिज्यिक त्याचबरोबर शेतीपंपांसाठीही विजेची मागणी वाढली आहे. पिके वाळण्याची भीती असल्यामुळे कृषीपंपाचा सर्वाधिक वापर होत आहे.
राज्यातील औष्णिक प्रकल्पातंर्गत ५ हजार २३९ मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येत आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पातंर्गत १४०० मेगावॅट वीजनिर्मिती होते. केंद्रीय प्रकल्पातंर्गत ४ हजार ४५० मेगावॅट, सौर उर्जेतंर्गत ४११ मेगावॅट विजेची उपलब्धता होत आहे. अदानी कंपनीकडून २३३५ मेगावॅट, पवन उर्जेतून २७८ मेगावॅट, याशिवाय जिंदाल प्रकल्पातून २८७ मेगावॅट, रतन इंडिया प्रकल्पातून २७० मेगावॅट मिळून एकूण १४ हजार ८७० मेगावॅट विज निर्मिती होत असून तसा पुरवठा करण्यात येत आहे. मुंबईसाठी ३ हजार ३३० मेगावॅट विजेची मागणी असून त्यासाठी मुंबईतील निर्मिती केंद्रातूनच पुरवठा होत आहे.

राज्यातील औष्णिक प्रकल्पांना कोळशाचा तुटवडा भासत असल्याने विजनिर्मितीवर परिणाम झाला आहे. याशिवाय पाण्याची पातळी खालावल्याने जलविद्युत प्रकल्पातून विजनिर्मितीवर मर्यादा आली आहे. त्यामुळे सोमवारी भारनियमन करण्यात आले. महावितरण खुल्या बाजारातून वीज खरेदी करून पुरवठा करीत आहे.
- पी. एस. पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, प्रकाशगड, मुंबई.

Web Title: Already the October heat, the power off; load-shedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.