एसटी कर्मचा-यांचे भत्ते ‘अमानवीय’ !कर्मचा-यांना मार्ग भत्ता अवघे ९ पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 05:30 AM2017-10-19T05:30:24+5:302017-10-19T05:30:41+5:30

सातवा वेतन आयोग लागू व्हावा, यासाठी राज्यभर एसटी कर्मचाºयांचा संप सुरू आहे. वाढत्या महागाईमुळे जनतेचे जगणे अवघड होत आहे. त्यातच एसटी कामगारांना देशातील अन्य महामंडळाच्या तुलनेत

The allowance for ST employees is 'Inhuman'! The money allowance for employees is only 9 paise | एसटी कर्मचा-यांचे भत्ते ‘अमानवीय’ !कर्मचा-यांना मार्ग भत्ता अवघे ९ पैसे

एसटी कर्मचा-यांचे भत्ते ‘अमानवीय’ !कर्मचा-यांना मार्ग भत्ता अवघे ९ पैसे

Next

- महेश चेमटे
मुंबई: सातवा वेतन आयोग लागू व्हावा, यासाठी राज्यभर एसटी कर्मचाºयांचा संप सुरू आहे. वाढत्या महागाईमुळे जनतेचे जगणे अवघड होत आहे. त्यातच एसटी कामगारांना देशातील अन्य महामंडळाच्या तुलनेत सर्वांत कमी पगार मिळत असल्याचे विदारक सत्य आहे. कर्मचा-यांना मार्ग भत्ता म्हणून अवघे ९ पैसे मिळत असल्याची धक्कादायक माहिती संपाच्या निमित्ताने समोर येत आहे.
‘गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी’ या धोरणानुसार महामंडळ सेवा पुरवते. राज्य एसटी महामंडळात १ लाख ५ हजार ७८६ कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचाºयांना भत्ता देण्यात येतो. मूळ वेतन व भत्ता अशा प्रकारांमध्ये त्यांना वेतन मिळते. मार्ग भत्ता म्हणून १५० किमीरपर्यंत ४ रुपये दर दिवशी या प्रमाणे दिले जातात. १५१ ते २०० किमीपर्यंत ०.०९ पैसे, प्रती किमी. दिले जाते. २०१ ते २२५ किमीपर्यंत ०.१५ पैसे प्रति किमी., २२५ किमीच्या पुढे ०.२० पैसे प्रति किमीप्रमाणे पैसे दिले जातात.
कर्मचा-यांना रात्रवस्ती भत्त्यासाठी सर्वसाधारण ठिकाणी ९ रुपये भत्ता मिळतो. जिल्हा ठिकाणी तो ११ रुपये आहे. विनिर्दिष्ट (पालिका) ठिकाणी तो १५ रुपये आहे. रात्र वाहतूकसेवा भत्ता म्हणून प्रत्येक रात्रीसाठी ११ रुपये मिळतात. वैद्यकीय भत्ता प्रतिमहा ५३ रुपये आहे. देशाच्या अन्य राज्यांतील महामंडळाच्या तुलनेत महाराष्ट्रातील एसटी महामंडळातील वेतन कमी आहे. शिवाय विविध भत्त्यांमधूनही कर्मचाºयांच्या वेतनात मोठी वाढ होत नाही. संपात सहभागी कर्मचाºयांनी भत्ता वाढीचीही मागणी केली.
 

Web Title: The allowance for ST employees is 'Inhuman'! The money allowance for employees is only 9 paise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.