राजू शेट्टी यांच्यासह सर्व भाजप विरोधी पक्षांची महाआघाडी : अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 01:27 PM2018-09-01T13:27:26+5:302018-09-01T13:41:36+5:30

मतांचे विभाजन झाले की भाजपचे फावते हा गेल्या निवडणुकीचा अनुभव आहे त्यामुळे यावेळेला खासदार राजू शेट्टी यांच्यासह सर्व भाजप विरोधी पक्षांची महाआघाडी करणार असल्याची घोषणा कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी हातकणंगले येथील जाहीर सभेत केली.

All BJP anti-BJP parties including Raju Shetty: Big bang: Ashok Chavan | राजू शेट्टी यांच्यासह सर्व भाजप विरोधी पक्षांची महाआघाडी : अशोक चव्हाण

राजू शेट्टी यांच्यासह सर्व भाजप विरोधी पक्षांची महाआघाडी : अशोक चव्हाण

Next
ठळक मुद्देशेट्टी यांच्यासह सर्व भाजप विरोधी पक्षांची महाआघाडी : अशोक चव्हाण काँग्रेसने प्रचाराचा नारळ फोडला, राजू आवळे यांची उमेदवारी जाहीर

कोल्हापूर : मतांचे विभाजन झाले की भाजपचे फावते हा गेल्या निवडणुकीचा अनुभव आहे त्यामुळे यावेळेला खासदार राजू शेट्टी यांच्यासह सर्व भाजप विरोधी पक्षांची महाआघाडी करणार असल्याची घोषणा कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी हातकणंगले येथील जाहीर सभेत केली.

आपआपसांत भांडत बसल्याने नुकसान काँग्रेसचेच झाले..त्यामुळे मतभेद गाडून एक व्हा असे आवाहन त्यांनी केले..या सभेत माजी खासदार कल्लाप्पाणा आवाडे आणि जयवंतराव आवळे यांनी एकमेकांना मिठ्ठी मारून मनोमिलन झाल्याचे जाहीर केले.

काँग्रेस पक्षातर्फे शुक्रवार पासून सुरू आलेली जनसंघर्ष यात्रा शनिवारी हातकणंगले तालुक्यात पोहचली..शिरोळ, इचलकरंजी मध्ये जाहीर सभा घेऊन ही यात्रा रविवारी सांगली जिल्ह्यात जात आहे.

हातकणंगले येथील सभेला तरुण कार्यकर्ते व महिलांची संख्या चांगली होती. हातकणंगले विधानसभा मतदार संघातून काँग्रेसने राजू जयवंतराव आवळे यांची उमेदवारी जाहीर केली आणि प्रचाराचा नारळ फोडला.

Web Title: All BJP anti-BJP parties including Raju Shetty: Big bang: Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.