मराठा समाजातील विद्यार्थ्यांना निम्म्या शुल्कावरच प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 06:23 AM2018-06-15T06:23:03+5:302018-06-15T06:23:03+5:30

मराठा समाजातील आठ लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांमध्ये निम्मे शुल्क घेऊन प्रवेश देण्याच्या सूचना प्रत्येक महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.

 Admission in half fees the students of Maratha community | मराठा समाजातील विद्यार्थ्यांना निम्म्या शुल्कावरच प्रवेश

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना निम्म्या शुल्कावरच प्रवेश

googlenewsNext

विशेष प्रतिनिधी 
मुंबई - मराठा समाजातील आठ लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांमध्ये निम्मे शुल्क घेऊन प्रवेश देण्याच्या सूचना प्रत्येक महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. तसे न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई केली जाईल, असे महसूल मंत्री तथा मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिली.
उपसमितीची बैठक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. त्यानंतर पाटील यांनी सांगितले की, पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपये असलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी निम्मे शुल्क भरून प्रवेश मिळेल. निम्मे शुल्क राज्य शासन भरणार आहे. जूनपासून सुरू होणाºया प्रवेश प्रक्रियेसाठी ही योजना लागू राहणार आहे.
स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत सुरू करण्यात आलेलेल्या व्याज परतावा योजनेत सहभागी होणाºया मराठा समाजातील उद्योजकांना दहा लाखांपर्यंतच्या कर्जावरील व्याज राज्य शासन भरणार आहे.
परंतु पहिल्या महिन्यात व्याज
व मुद्दलाचा बोजा पडणार असल्यामुळे या तरुणांना दिलासा देण्यासाठी त्यांचे पहिल्या महिन्याचे कर्जावरील व्याज व मुद्दलाची रक्कम राज्य
शासन बँकेत भरणार आहे. तर
दुसºया महिन्यापासून व्याजाची
रक्कम लाभार्थ्याच्या बँक
खात्यात महामंडळामार्फत देण्यात येणार आहे.

Web Title:  Admission in half fees the students of Maratha community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.