कोल्हापूर-गगनबावडा रोडवरील अपघातातून बचावलेल्या नाट्यदिग्दर्शकाने सांगितली घटनास्थळावरील कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 12:17 PM2017-11-24T12:17:58+5:302017-11-24T12:18:50+5:30

भीषण अपघातातून वाचलेल्या सांगलीतील नाट्यदिग्दर्शक यशोधन गडकरी यांनी घटनास्थळी नेमकं काय घडलं? याबद्दलची कथा सांगितली आहे.

ACCIDENT AT KOLHAPUR-GAGANBAWAD ROAD | कोल्हापूर-गगनबावडा रोडवरील अपघातातून बचावलेल्या नाट्यदिग्दर्शकाने सांगितली घटनास्थळावरील कहाणी

कोल्हापूर-गगनबावडा रोडवरील अपघातातून बचावलेल्या नाट्यदिग्दर्शकाने सांगितली घटनास्थळावरील कहाणी

Next

कोल्हापूर- गगनबावडा रोडवरील लेंघे गावाजवळ एका बसला अचानक आग लागली आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. बस चालकाच्या प्रसंगावधानानं इतर 18 प्रवाशांचा जीव बचावला आहे. या भीषण अपघातातून वाचलेल्या सांगलीतील नाट्यदिग्दर्शक यशोधन गडकरी यांनी घटनास्थळी नेमकं काय घडलं? याबद्दलची कथा सांगितली आहे. यशोधन गडकरी हे गोव्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून परतत असताना अपघात झालेल्या बसने प्रवास करत होते.

23 नोव्हेंबरच्या संध्याकाळी इफ्फीतून सिनेमा पाहून निघाले होते. सांगलीत होणाऱ्या राज्यनाट्य स्पर्धेतील नाटकासाठी ते इफ्फीतून काल संध्याकाळी निघाले होते. पणजी बसस्टॅण्डवर आल्यावर त्यांची शेवटची म्हणजेच साडेनऊ वाजता असणारी बस चुकली. त्यानंतर त्यांनी खाजगी बसने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. पणजीत असणाऱ्या त्या बसमध्ये फक्त एकच सीट शिल्लक होती. बसमधील पॅसेज अत्यंत कमी होता त्यामुळे आपातकालीन परिस्थितीत कसा होणार? असा विचारही त्यांच्या डोक्यात आला. ती बस प्रवाशांना जेवणासाठी कुठेही थांबवणार नव्हती त्यामुळे यशोधन यांनी शौचालयाला जायचं खोटं कारण सांगून ते म्हापसामध्ये उतरले आणि ऑम्लेट घेऊन ते पुन्हा गाडीत आले. गाडीमध्ये ऑम्लेट खाल्ल्यानंतर त्यांनी झोपण्याचं ठरवलं. पण झोप लागल नव्हती. गाडी म्हापसावरून पुढे गेल्यावर दोन वृद्ध स्त्रीया गाडीमध्ये चढल्या. रात्री दीड-दोन वाजेच्या सुमारास त्यांना झोप लागली. झोप लागत असताना त्यांना झोपेत काहीतरी जळल्याचा वास आला, नाका-तोंडातही धूर गेला होता. डोळे उघडल्यावर संपूर्ण बसमध्ये धूर पसरलेला दिसला. 

बसमध्ये नेमकं काय घडतंय हे समजायचा आधीच यशोधन यांनी बसमधून बाहेर पडायची धडपड केली. बसच्या एक्झिटकडे पाहिल्यावर फक्त धूर दिसत होता. त्याच धुरात एका मानवी आकृतीने उडी घेऊन जीवाच्या आकांताने पळ काढला. त्यावेळी बसला आग लागल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यशोधन यांनी लगेचच शूज, चष्मा व त्यांची बॅग सावरत बसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. बसच्या दरवाजातून बाहेर उडी मारून रस्त्याच्या शेजारी असलेल्या शेतात धावलो व तेथे असलेल्या एका मंदिराचा सहारा घेतला. 

ड्रायव्हर-क्लिनरने प्रयत्न करूनही बसने पेट घेतला. घटनास्थळावरून हाका,गोंगाट, काचा फोडण्याचे आवाज ऐकु येत होते. बसमधून उड्या मारल्याने अनेकांना जखमा झाल्या होत्या.  मंदिरामागे यशोधन यांच्यासोबत इतर चार-पाच जण होती. त्यांनी  अंधाराच शेतातून गाडीच्या विरूध्द रस्त्याच्या उंचवट्याकडे गेले. १०-१५ मीटर पुढे अंधारात गेल्यावर समजलं. सर्वात मागे माझ्याच बाजूची चार तरूण पोरं आत अडकल्याचं समजलं.  पण एव्हाना गाडीने पूर्ण पेट घेतला होता. आता मागील फोडलेल्या काचांमधून दोघांनी बाहेर उड्या घेतल्या. २०-२५ मिनिटात गाडीचा फक्त सांगाडा दिसू लागला. या भीषण आगीत यशोधन यांच्या बाजूला असणाऱ्या दोघांना होरपळून मृत्यू झाला. 
बसला लागलेल्या भीषण आगीतून 14-15 जण सुखरूप वाचले. 
 

Web Title: ACCIDENT AT KOLHAPUR-GAGANBAWAD ROAD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.