१,५०० औद्योगिक भूखंड परत घेतले

By admin | Published: June 4, 2015 04:50 AM2015-06-04T04:50:54+5:302015-06-04T04:50:54+5:30

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) उद्योग उभे करण्याकरिता दिलेले, परंतु दीर्घकाळ तसेच पडून राहिलेले १,५०० भूखंड उद्योग खात्याने परत घेतले आहेत

1,500 industrial plots were recovered | १,५०० औद्योगिक भूखंड परत घेतले

१,५०० औद्योगिक भूखंड परत घेतले

Next

संदीप प्रधान, मुंबई
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) उद्योग उभे करण्याकरिता दिलेले, परंतु दीर्घकाळ तसेच पडून राहिलेले १,५०० भूखंड उद्योग खात्याने परत घेतले आहेत. तर भूखंडाचा औद्योगिक कारणांकरिता वापर न करणाऱ्या ४,००० उद्योगांना नोटीस देण्यात आली आहे.
एमआयडीसी क्षेत्रात उद्योग उभारण्याकरिता जमीन दिल्यावर मुंबई-पुणे परिसरात तीन वर्षांत; ठाणे, कोकण, खान्देशात चार वर्षांत तर विदर्भ-मराठवाड्यात पाच वर्षांत उद्योग उभे करणे बंधनकारक होते. मात्र राज्यातील किमान ४,००० औद्योगिक भूखंडधारकांनी उद्योग स्थापन करण्याकरिता घेतलेले भूखंड तसेच ठेवले होते. काही भूखंड तर १२ ते १५ वर्षे तसेच रिक्त ठेवले होते. कालांतराने अधिक किमतीत सदर भूखंड विकण्याचा भूखंडधारकांचा प्रयत्न असतो. त्यामुळे सर्वप्रथम अशा भूखंडांची विक्री करण्याची असलेली तरतूद रद्द करण्यात आली.

Web Title: 1,500 industrial plots were recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.