भाजपा नेत्यांशी जवळीक वाढली; काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ BJP च्या वाटेवर? चर्चेला उधाण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 09:42 PM2024-02-09T21:42:10+5:302024-02-09T21:42:30+5:30

Kamal Nath May Join BJP: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

MP Kamal Nath News: Closeness with BJP leaders increased; Veteran Congress leader Kamal Nath on the way to BJP? | भाजपा नेत्यांशी जवळीक वाढली; काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ BJP च्या वाटेवर? चर्चेला उधाण...

भाजपा नेत्यांशी जवळीक वाढली; काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ BJP च्या वाटेवर? चर्चेला उधाण...


Kamal Nath News: एकीकडे विरोधकांच्या इंडिया आघाडीतून पक्ष बाहेर पडत आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी NDA आणखी मजबूत होताना दिसत आहे. अशातच मध्य प्रदेशातून एक मोठी माहिती समोर आली आहे. भाजप मध्य प्रदेशातकाँग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत भाजप आहे. मीडिया रिपोर्टनुसार, काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ लवकरच भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.

रिपोर्टनुसार, गेल्या काही दिवसांपासून कमलनाथ यांची भाजपशी जवळीक वाढत आहे. अलीकडेच त्यांनी मुख्यमंत्री मोहन यादव यांची दुसऱ्यांदा भेट घेतली. या भेटीनंतर कमलनाथ आणि भाजप यांच्यात जॉयनिंग फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू असल्याचा दावा केला जातोय. कमलनाथ यांच्यासोबत त्यांचा मुलगा नकुलनाथ हेदेखील भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. 

का सुरू झाली चर्चा?
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने कमलनाथ यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवले होते. तेव्हापासून मध्यप्रदेशमध्ये तर्क-वितर्कांना सुरुवात झाली होती. कमलनाथ पक्षावर नाराज असून, लवकरच भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असे बोलले जात आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक नेतेही काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. या विविध दाव्यांवर अद्याप भाजप किंवा कमलनाथ यांच्याकडून काहीच प्रतिक्रिया आलेली नाही. या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

 

Web Title: MP Kamal Nath News: Closeness with BJP leaders increased; Veteran Congress leader Kamal Nath on the way to BJP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.