बहिणीला म्हणाला, मेडिकलमध्ये जाऊन येतो अन्...; लातुरात रेल्वे उड्डाण पुलावरुन उडी मारुन तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 05:50 PM2022-08-16T17:50:45+5:302022-08-16T17:50:52+5:30

बहिणीकडून चहा घेऊन घराबाहेर पडला तो परतलाच नाही...

Youth committed suicide in Latur by jumping from railway bridge | बहिणीला म्हणाला, मेडिकलमध्ये जाऊन येतो अन्...; लातुरात रेल्वे उड्डाण पुलावरुन उडी मारुन तरुणाची आत्महत्या

बहिणीला म्हणाला, मेडिकलमध्ये जाऊन येतो अन्...; लातुरात रेल्वे उड्डाण पुलावरुन उडी मारुन तरुणाची आत्महत्या

Next

लातूर: बहिणीकडून चहा घेऊन घराबाहेर पडलेल्या एका तरुणाने लातूरमधील बार्शी रोड रेल्वे उड्डाण पुलावरुन उडी मारुन आयुष्य संपविल्याची घटना मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. आनंद शिवाजीराव क्षीरसागर (वय 27,रा. चिखली ता. अहमदपूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत दुपारी  एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आहमदपूर तालुक्यातील चिखलीचा रहिवासी असलेला आनंद क्षीरसागर याच्या दोन्ही बहिणी लातूरतील श्रीनगर भागात वास्तव्याला आहेत. आनंद क्षीरसागर त्याच्या बहिणीकडे आला होता. मंगळवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास मेडिकलवरून गोळी आणतो म्हणून घराबाहेर पडला. त्यांनतर बार्शी रोडवर असलेल्या रेल्वे उड्डाण पुलावरून उडी मारुन आत्महत्या केली. तर इकडे जवळपास तास-दीड तास झाले भाऊ असला नाही म्हणून बहिणीने भावाच्या मोबाइलवर फोन केला. घटनास्थळी असलेल्या एका व्यक्तीने मोबाइल उचलून घटनेची माहिती दिली.

बहिण म्हणते, माझा भाऊ शांत...

ही घटना ऐकून बहिणीच्या पायाखालची जमीनच सरकली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यालाही टोल फ्री क्रमांकावरून घटनेची माहिती मिळाली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, सहायक पोलीस निरीक्षक सर्जेराव जगताप, पोलीस नाईक मन्मथ धुमाळ यांच्या पथकाने भेट देऊन पंचनामा केला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मयत आनंदची बहिण म्हणते माझा भाऊ निर्व्यसनी आणि शांत स्वभावाचा होता. त्याचे अद्याप लग्नही झाले नव्हते. त्याला काही ताणतणावही नव्हता. मात्र, त्याने आत्महत्या का केली? हेच समजत नाही. या घटनेने कुटूंबीयांना धक्का बसला आहे. 

Web Title: Youth committed suicide in Latur by jumping from railway bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.