रेणापूर तालुक्यातील तरूणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 05:58 PM2020-09-30T17:58:22+5:302020-09-30T17:58:58+5:30

रेणापूर तालुक्यातील तत्तापूर येथील एका २५ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना बुधवार दि. ३० रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. याबाबत गांधी चौक पोलीस ठाण्यात दुपारी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाचे कारण मात्र अद्याप स्पष्ट नाही.

Murder of a youth in Renapur taluka | रेणापूर तालुक्यातील तरूणाचा खून

रेणापूर तालुक्यातील तरूणाचा खून

googlenewsNext

लातूर : रेणापूर तालुक्यातील तत्तापूर येथील एका २५ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना बुधवार दि. ३० रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. याबाबत गांधी चौक पोलीस ठाण्यात दुपारी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाचे कारण मात्र अद्याप स्पष्ट नाही.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी ओम आत्मलिंग चिल्लरगे (२८ रा. तत्तापूर ता. रेणापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार श्रीकांत उर्फ बबलू आत्मलिंग चिल्लरगे (२५) याचा लातुरातील ग्रामदैवत श्री रत्नेश्वर-श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात कोणीतरी अनोळखी व्यक्तींनी डोक्याच्या मागील भागावर हत्याराने हल्ला करुन खून केला.

ही घटना मंगळवारी रात्री घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. घटनास्थळी लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, गांधी चौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हिबारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गफार शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लोंढे यांनी भेट देऊन पाहणी केली.

याबाबत मयताचा भाऊ ओम चिल्लरगे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गांधी चौक पोलीस ठाण्यात दुपारी अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Murder of a youth in Renapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.