राजकीय वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी, 8 जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 12:52 IST2018-11-11T12:30:47+5:302018-11-11T12:52:46+5:30

कोल्हापूर राजकीय वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या हाणामारीत 8 जण गंभीर जखमी झाले आहेत.

two group clashes in kolhapur, eight people injured | राजकीय वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी, 8 जण गंभीर जखमी

राजकीय वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी, 8 जण गंभीर जखमी

ठळक मुद्देकोल्हापूरमध्ये राजकीय वादातून दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत 8 जण गंभीर जखमी.सीताराम लाड आणि बारकू लाड या दोन गटात ही हाणामारी झाली असून तलवारी आणि कोयत्याने एकमेकांवर वार करण्यात आले.राजकीय वादातून ही हाणामारी झाल्याची माहिती मिळत आहे.

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये राजकीय वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या हाणामारीत 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. शाहूवाडी तालूक्यातील गेळवडे गावात ही घटना घडली. 

सीताराम लाड आणि बारकू लाड या दोन गटात ही हाणामारी झाली असून तलवारी आणि कोयत्याने एकमेकांवर वार करण्यात आले. तलवारीच्या हल्ल्यात सीताराम लाड यांचा उजवा हात तुटला आहे. राजकीय वादातून ही हाणामारी झाल्याची माहिती मिळत आहे. हाणामारीत जखमी झालेल्या व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 



 

Web Title: two group clashes in kolhapur, eight people injured