‘लोकमत’चा आज वर्धापनदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:54 AM2017-08-21T00:54:47+5:302017-08-21T00:54:47+5:30

Today's anniversary of 'Lokmat' anniversary | ‘लोकमत’चा आज वर्धापनदिन

‘लोकमत’चा आज वर्धापनदिन

Next



महासैनिक दरबार हॉलमध्ये रंगणार स्नेहमेळावा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : समाजविघातक शक्तींना विरोध व समाजमनाचा आरसा असलेल्या आणि जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नांत प्रबोधनाची भूमिका बजावणाºया ‘लोकमत’चा आज, सोमवारी तेरावा वर्धापनदिन सोहळा साजरा होत आहे. त्यानिमित्त येथील शासकीय विश्रामगृहाजवळील महासैनिक दरबार हॉलमध्ये सायंकाळी पाच ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत वाचक, हितचिंतक, जाहिरातदार व विक्रेत्यांचा स्नेहमेळावा होणार आहे.
महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या ‘लोकमत’ने वाचकांचा विश्वास आणि पाठबळावर कोल्हापूरमध्ये अव्वल स्थान पटकाविले आहे. जिल्ह्यासह शहरातील विविध प्रश्नांची मांडणी, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी घेतलेली संघर्षाची भूमिका, विधायकतेला प्रोत्साहन आणि समाजबदलाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेत जे चांगले आहे, त्याला आवर्जून बळ देण्याची भूमिका ‘लोकमत’ सक्षमपणे बजावीत आहे. त्यामुळे वाचकांचा ‘लोकमत’ला उत्स्फूर्त प्रतिसाद व भक्कम पाठबळ मिळत आहे. वर्धापन दिनानिमित्तच्या विशेषांकाचा विषय ‘डिजिटल लाईफ’ असा आहे. दर्जेदार अशा या पुरवणीचे प्रकाशन आज, सोमवारी साडेदहाच्या सुमारास करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी अंक समर्पित करून होणार आहे. त्यानंतर सायंकाळी पाच ते साडेआठपर्यंत स्नेहमेळावा होणार आहे.
‘लोकमत इनिशिएटिव्ह’ अंतर्गत सामाजिक उपक्रमांना बळ दिले आहे. बातम्यांसह ‘सखी मंच’, ‘युवा मंच’, ‘बाल विकास मंच’च्या माध्यमांतून ‘लोकमत’ शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवितो. कोल्हापूरच्या मातीशी नाळ जोडलेल्या ‘लोकमत’चा रोजचा अंक व विविध पुरवण्यांमधून वाचकांना सकस, उत्तम ज्ञान आणि माहिती देण्याचा प्रयत्न राहिला आहे. त्याबळावरच ‘लोकमत’ वर्धापनदिन साजरा करीत आहे. त्यास कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘लोकमत’च्या वाटचालीस बळ द्यावे.
‘डिजिटल लाईफ’ विशेषांकाविषयी...
आजचे युग माहिती-तंत्रज्ञानाचे आणि डिजिटलचे आहे. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपले आयुष्य असंख्य गॅझेटस्नी व्यापले आहे. किंबहुना त्यांच्याशिवाय आपण राहूच शकत नाही, अशी एक सामाजिक स्थिती आहे. आधुनिक तंत्रज्ञान आपली कामे अल्लाउद्दीनच्या चिरागमधील जीनप्रमाणे चुटकीसारखी पूर्ण करते. याच घरातील लहान-मोठ्या वस्तूंपासून मोबाईल, इंटरनेट, संगणक, शेती, सहकार, बँकिंग, शिक्षण, व्यवसाय, उद्योग, नोकरी अशी सर्वच क्षेत्रे या डिजिटल तंत्रज्ञानाने व्यापली आहेत. ‘लोकमत’च्या वर्धापनदिनानिमित्त प्रकाशित होत असलेल्या विशेषांकामध्ये या ‘डिजिटल लाईफ’चे जग उलगडण्यात आले आहे.
स्थळ : शासकीय विश्रामगृहाजवळील
महासैनिक दरबार हॉल
वेळ : सायंकाळी पाच ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत

Web Title: Today's anniversary of 'Lokmat' anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.