Kolhapur: करेकुंडीत पाझर तलावात बुडून दोन शाळकरी मुलींसह तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 11:38 AM2024-05-07T11:38:38+5:302024-05-07T11:39:35+5:30

चंदगड : तलावात पोहायला गेलेल्या शाळकरी मुलींना वाचवायला गेल्या सेवानिवृत्त जवानासह दोन मुली अशा तिघांचा बुडून मृत्यू झाला. करेकुंडी ...

Three including two schoolgirls died after drowning in Pazar lake in Karekund Kolhapur | Kolhapur: करेकुंडीत पाझर तलावात बुडून दोन शाळकरी मुलींसह तिघांचा मृत्यू

Kolhapur: करेकुंडीत पाझर तलावात बुडून दोन शाळकरी मुलींसह तिघांचा मृत्यू

चंदगड : तलावात पोहायला गेलेल्या शाळकरी मुलींना वाचवायला गेल्या सेवानिवृत्त जवानासह दोन मुली अशा तिघांचा बुडून मृत्यू झाला. करेकुंडी (ता. चंदगड) येथे काल, सोमवारी ही दुर्दैवी घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, भर उन्हात करेकुंडीत शाळकरी मुली पोहायला गेल्या होत्या. दरम्यान दमछाक होऊन त्या पाण्यात बुडू लागल्या. सेवानिवृत्त विजय विठोबा शिनोळकर हे त्यांना वाचवायला गेले. मात्र, त्यात चैतन्या नागोजी गावडे (१२, रा. आसगाव, ता. चंदगड) आणि समृद्धी अजय शिनोळकर (१०, रा. करेकुंडी, सध्या रा. वैताकवाडी) या दोन्ही मुलींसह तिघेही तलावात बुडाले.

सेवानिवृत्त जवान विजय शिनोळकर गावानजीकच्या पाझर तलावात मुलींसह पोहायला गेले होते. पोहताना दोन्ही मुलींची दमछाक झाली आणि त्या बुडाल्या. त्यांना वाचवताना विजय हेही बुडाले. दरम्यान, सायंकाळी तलावाच्या काठावर तिघांचे कपडे गावातील एकाला दिसले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तिन्ही मृतदेह ग्रामस्थांनी पाण्याबरोबर काढले. 

चैतन्या ही मामाच्या गावी सुट्टी घालवण्यासाठी आली होती; तर विजय यांची पुतणी वैताकवाडीहून करेकुंडी येथे काकांच्या घरी राहायला आली होती. मृतदेह पाण्याबाहेर काढताच नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. विजय यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Web Title: Three including two schoolgirls died after drowning in Pazar lake in Karekund Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.