लेखणीमुळे महिलांच्या आव्हानांना वाचा : सुषमा देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 01:07 AM2019-03-10T01:07:44+5:302019-03-10T01:08:12+5:30

महिला राजकारणापासून ते खासगी कंपन्यांमध्ये सक्रिय असल्या तरी त्यांच्या पुढे पुरुषांच्या बरोबरीने काम करणे, घर-संसार, परंपरा सांभाळत आपले कर्तृत्व सिद्ध करणे हे आव्हान असते. अशा परिस्थितीत महिला पत्रकारांनी लेखणीतून

Sushma Desai reads women's challenges: | लेखणीमुळे महिलांच्या आव्हानांना वाचा : सुषमा देसाई

लेखणीमुळे महिलांच्या आव्हानांना वाचा : सुषमा देसाई

Next
ठळक मुद्दे‘कोल्हापूर प्रेस क्लब’तर्फे महिला पत्रकारांचा सन्मान

कोल्हापूर : महिला राजकारणापासून ते खासगी कंपन्यांमध्ये सक्रिय असल्या तरी त्यांच्या पुढे पुरुषांच्या बरोबरीने काम करणे, घर-संसार, परंपरा सांभाळत आपले कर्तृत्व सिद्ध करणे हे आव्हान असते. अशा परिस्थितीत महिला पत्रकारांनी लेखणीतून महिलांच्या आव्हांनाना वाचा फोडावी, असे आवाहन ग्रामसेवक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या सुषमा देसाई यांनी शुक्रवारी येथे केले.

जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने आयोजित पत्रकार महिलांच्या सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी उद्योजिका राजश्री जाधव-सप्रे प्रमुख उपस्थित होत्या. कोणताही धर्म किंवा परंपरा सांभाळताना त्याचा पहिला त्रास महिलांनाच होतो यात बदल झाला पाहिजे अशी अपेक्षा देसाई यांनी व्यक्त केली. उद्योग क्षेत्रात तर फार कमी महिला आहेत हे उद्योजिका म्हणून काम करताना नेहमीच जाणवते. नेहमी इतरांच्या कार्यक्रमांचे वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकारांचा सत्कार होणे ही अभिमानाची गोष्ट आहे, असे मत जाधव-सप्रे यांनी व्यक्त केले.
प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील यांनी प्रेस क्लबच्या आवारात महिला पत्रकारांसाठी स्वतंत्र कक्ष उभारणार असल्याचे सांगितले. ‘लोकमत’च्या वरिष्ठ बातमीदार इंदुमती गणेश, ज्येष्ठ पत्रकार सुनंदा मोरे, सुरेखा पवार, स्वाती राजगोळकर, अहिल्या परकाळे, संघमित्रा चौगुले, श्रद्धा जोगळेकर, अश्विनी टेंबे, अनुराधा कदम, नंदिनी नरेवाडी, शुभांगी तावरे, स्वप्नाली मिठारी, धनश्री जाधव, नम्रता पाटील, सीमा पवार, पूनम देशमुख, कौशल्या आंग्रे, सुनंदा नाईक, संघवी राजवर्धन, अश्विनी खोंद्रे, माधुरी वाडकर, सुनीता कांबळे, श्रीया भास्कर यांंचा सत्कार करण्यात आला.

जागतिक महिला दिनानिमित्त शुक्रवारी कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने महिला पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुषमा देसाई, राजश्री सप्रे प्रमुख उपस्थित होत्या.

Web Title: Sushma Desai reads women's challenges:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.