कासकरशी संबंध जोडण्याची घाई सुप्रिया सुळे यांची पोलिसांवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:55 AM2017-09-21T00:55:04+5:302017-09-21T00:55:04+5:30

कोल्हापूर : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक केल्यानंतर त्याच्याशी राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्यांचा संबंध जोडण्याची पोलिसांनी घाईच केली.

 Supriya Sule's criticism of the police is related to Kasker's reluctance | कासकरशी संबंध जोडण्याची घाई सुप्रिया सुळे यांची पोलिसांवर टीका

कासकरशी संबंध जोडण्याची घाई सुप्रिया सुळे यांची पोलिसांवर टीका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक केल्यानंतर त्याच्याशी राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्यांचा संबंध जोडण्याची पोलिसांनी घाईच केली. हा प्रसिद्धीचा स्टंट असून, पोलिसांनी पक्षावर आक्षेप घेण्यापूर्वी पुरावे गोळा करावेत, ते सादर करावेत व मगच कारवाई करावी. पक्षाचा एखादा नेता या कारवाईत दोषी आढळल्यास त्याच्यावर पक्षातर्फे कारवाई करू, असे या पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
शिवसेना सत्तेत असून आंदोलने करते, हा मोठा विनोदच असल्याची टीका सुळे यांनी केली व शिवसेनेचा ‘कन्फ्युज्ड पार्टी’ असाही उल्लेख केला. सेनेने एक तर सत्तेत राहावे अन्यथा सत्तेबाहेर पडून आंदोलने करावीत, असाही टोला त्यांनी मारला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमार्फत युवा संवाद यात्रेनिमित्त महाराष्टÑ दौरा सुरू आहे. राज्यात महिला सुरक्षा, हुंडाबळी, स्त्रीभ्रूणहत्यांचे प्रश्न गंभीर बनले आहेत. हे रोखण्यासाठी पोलीस, समाजाने काम केले पाहिजे, असे सुळे म्हणाल्या.

सदाभाऊ! नको रे बाबा..
कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नव्या पक्षाबाबत खासदार सुळे यांनी मौन पाळले. सदाभाऊंनी तुम्हाला एका समारंभातील भाषणात ‘बहीण’ संबोधले होते असे सांगताच, ‘सदाभाऊ! नको रे बाबा... मला सहा भाऊ आहेत तेवढेच बस्स...
नवे नाते जोडण्याची इच्छा नाही,’ असे त्यांनी सांगितले.
परप्रांतीयांना सवलती
राज्यात सलग पाच वर्षे स्थायिक झालेल्या परप्रांतीयांना शैक्षणिक सवलती द्याव्यात, अशी राष्टÑवादी काँग्रेसची भूमिका आहे. त्याबाबत संसदेत आवाज उठविणार असल्याचेही सुळे यांनी सांगितले.

Web Title:  Supriya Sule's criticism of the police is related to Kasker's reluctance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.