नोकरीवरुन काढलेच्या रागातुन व्यवस्थापकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 01:45 PM2019-05-28T13:45:16+5:302019-05-28T13:47:13+5:30

राजारामपुरी जनता बझार चौकातील एका प्रसिध्द कापड दूकानातुन कामावरुन काढून टाकलेच्या रागातुन व्यवस्थापकास चौघा कामगारांनी बेदम मारहाण केली. सुशांत कुमार हत्तळगे (वय ३५, रा. जयसिंगपुर) असे जखमीचे नाव आहे. शाहुपूरी पोलीसांनी संशयित रणजित लोंढे, प्रविण शिंगाडे, महेंद्र पवार, सचिन सिंग (सर्व रा. राजारामपुरी) यांचेवर गुन्हा दाखल केला. २७ मे रोजी हा प्रकार घडला.

Strike managers out of the huff | नोकरीवरुन काढलेच्या रागातुन व्यवस्थापकास मारहाण

नोकरीवरुन काढलेच्या रागातुन व्यवस्थापकास मारहाण

Next
ठळक मुद्देनोकरीवरुन काढलेच्या रागातुन व्यवस्थापकास मारहाणचौघांवर गुन्हा : राजारामपुरी जनता बझार चौकातील प्रकार

कोल्हापूर : राजारामपुरी जनता बझार चौकातील एका प्रसिध्द कापड दूकानातुन कामावरुन काढून टाकलेच्या रागातुन व्यवस्थापकास चौघा कामगारांनी बेदम मारहाण केली. सुशांत कुमार हत्तळगे (वय ३५, रा. जयसिंगपुर) असे जखमीचे नाव आहे. शाहुपूरी पोलीसांनी संशयित रणजित लोंढे, प्रविण शिंगाडे, महेंद्र पवार, सचिन सिंग (सर्व रा. राजारामपुरी) यांचेवर गुन्हा दाखल केला. २७ मे रोजी हा प्रकार घडला.

पोलीसांनी सांगितले, राजारामपुरी जनता बझार चौक परिसरात प्रसिध्द कापड दूकान आहे. याठिकाणी संशयित कामगार म्हणून नोकरीला होते. सुशांत हत्तळगे हे व्यवस्थापक आहेत. संशयित काम न करता नको तो उपदव्याप करीत होते. दूकानात येणाऱ्या ग्राहकासोबत दादागिरीच्या भाषेत बोलणे असे प्रकार करीत होते. त्यामुळे दूकान मालकाने या चौघांना कामावरुन काढून टाकण्यास व्यवस्थापक हत्तळगे यांना सांगितले. त्यानुसार त्यांना कामावरुन कमी केले.

संशयित चौघे आपली लॉबी बनविण्यासाठी प्रयत्न करीत होते. हा प्रकार व्यवस्थापनाच्या लक्षात आला. अनेक वर्षापासून काम करीत असताना काढून टाकल्याने संशयितांना व्यवस्थापक हत्तळगे यांचेबद्दल राग होता. २७ मे रोजी दूपारी चारच्या सुमारास ते दूकानात आले.

हत्तळगे यांना शिवीगाळ करुन बाहेर ओढून काठीने बेदम मारहाण केली. हा प्रकार दूकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलीसांनी त्याचे फुटेज ताब्यात घेतले. गुन्हा दाखल झालेची चाहुल लागताच संशयित पसार झाले. त्यांची धरपकड सुरु असलेची माहिती पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.

 

Web Title: Strike managers out of the huff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.