सदाभाऊंना वगळणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 04:48 AM2017-08-19T04:48:33+5:302017-08-19T04:48:36+5:30

सदाभाऊ खोत यांचे मंत्रिपद हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोट्यातील आहे;

Sadabhau will not be excluded | सदाभाऊंना वगळणार नाही

सदाभाऊंना वगळणार नाही

Next

कोल्हापूर : सदाभाऊ खोत यांचे मंत्रिपद हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोट्यातील आहे; त्यामुळे खासदार राजू शेट्टी यांनी खोत यांच्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली असली तरी, सदाभाऊ मंत्रिमंडळात राहतील, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापुरात मांडली. नारायण राणे यांचे भाजपमध्ये स्वागत करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गेले तीन महिने स्वाभिमानीचे खासदार शेट्टी आणि खोत यांच्यात दरी निर्माण झाल्यानंतर खोत यांच्या ‘स्वाभिमानी’तून हकालपट्टीत करण्यात आली. खोत यांचे मंत्रिपद काढून घेण्याची मागणीही ‘स्वाभिमानी’च्या काही पदाधिकाºयांनी केली होती. आता तर यापुढे जात खासदार शेट्टी यांनी खोत यांच्या मंत्रिपदाबाबत आठ दिवसांत निर्णय घ्या, असा ‘अल्टिमेटम’ मुख्यमंत्री फडणवीस यांना लेखी पत्राद्वारे दिला आहे. पाटील म्हणाले, खोत हे मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून मंत्री झाले आहेत; त्यामुळे ते मंत्रिमंडळात राहतील. मात्र जर शेट्टी हे ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’मध्ये राहणार असतील तर ‘स्वाभिमानी’ला आणखी एक मंत्रिपद देण्याबाबत आपण सूचना करू.

Web Title: Sadabhau will not be excluded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.