पुरोगामी विचारांचा जागर पुन्हा उभारी घेऊ शकतो : बाबा आढाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 12:04 AM2017-12-06T00:04:06+5:302017-12-06T00:11:32+5:30

आजरा : फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. आजच्या अंधारमय काळात प्रकाशाची ज्योत पेटत आहे.

Progressive thinking can revive the awakening: Baba Adhav | पुरोगामी विचारांचा जागर पुन्हा उभारी घेऊ शकतो : बाबा आढाव

पुरोगामी विचारांचा जागर पुन्हा उभारी घेऊ शकतो : बाबा आढाव

Next
ठळक मुद्देबेळगाव येथे राष्ट्रवीरकार शामराव देसाई पुरस्कार प्रदानपैशाला हात लावायला सरकारला कोणी रोखलं आहे काय?

आजरा : फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. आजच्या अंधारमय काळात प्रकाशाची ज्योत पेटत आहे. त्यामुळे पुरोगाम्यांनी खचून न जाता नव्या पिढीमध्ये विचारांची पेरणी केल्यास पुरोगामी विचारांचा जागर पुन्हा उभारी घेऊ शकतो, असा विश्वास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी व्यक्त केला.

बेळगाव येथील ज्योती महाविद्यालयात बाबा आढाव यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कम्युनिष्ट नेते कॉ. कृष्णा मेणसे यांच्या हस्ते राष्ट्रवीरकार गुरुवर्य शामराव देसाई पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आढाव म्हणाले, समाजातील मोठा वर्ग आजही अंधश्रद्धेत हरवला आहे. अंधश्रद्धा दूर करायची असेल तर विज्ञानवादी संस्कारक्षम पिढी निर्माण होण्याची गरज आहे. जोपर्यंत तरुण पिढीशी संवाद होत नाही. तोपर्यंत विचारांचा आबोला राहणार आहे. सत्यशोधक चळवळ अनेकांनी पुढे नेली ती आताच का थबकली याचा विचार करण्याची गरज आहे.

नोटाबंदीसारख्या निर्णयामुळे कष्टकरांची उपासमार झाली. आज देशातील ५० कोटी जनता असुरक्षित, अस्वस्थ आणि असंघटित आहे. असे असताना देशातील मंदिरातील सोने, पैशाला हात लावायला सरकारला कोणी रोखलं आहे काय? असा सवाल करून हमीभावाचा मूळ प्रश्न सोडविला जात नाही तोपर्यंत आत्महत्या होणारच असल्याचे सांगितले.

यावेळी डॉ. मंजुश्री पवार म्हणाल्या, राष्ट्रवीरकार देसाई यांनी निर्भिड पत्रकारिता केली. राष्ट्रवीरकारांनी अज्ञान, अंधश्रद्धेवर, धार्मिक गुलामगिरीविरुद्ध लेखणी व कृतीतून घणाघात केला. त्यांचे अप्रकाशित असलेले लेख ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार संपादित करणार आहेत. यावेळी प्राचार्य आनंद मेणसे यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, प्रकाश मरगाळे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिप्पूरकर, शिवाजी देसाई, प्रा. डॉ. नवनाथ शिंदे, कॉ. संपत देसाई, प्रा. डॉ. प्रकाश पवार, एम. डी. कांबळे यांसह बेळगाव, आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. राजाभाऊ पाटील यांनी स्वागत केले. प्रा. मायाप्पा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विक्रम पाटील यांनी आभार मानले.

बेळगावात लक्ष्मी यात्रा बंद
सत्यशोधक चळवळ मोठ्या प्रमाणात रुजविलेल्या बेळगावमध्ये १९३६ पासून लक्ष्मी यात्रा होत नाही. यात्रा, मंदिरापेक्षा शिक्षणावर खर्च झाला पाहिजे, असेही मेणसे यांनी यावेळी सांगितले.
‘शाहू महाराजांची माया वेगळी’

आढाव यांनी शाहू महाराजांच्या निधनानंतर महाराजांसोबत असणाºया वृद्ध धनगराला आपण भेटल्याचे सांगितले. त्यावेळी धनगराला राजा गेल्यामुळे आता तुम्हीच राजे झाला असा मिश्किलपणे सवाल केला. त्यावर तो धनगर म्हणाला, ‘आम्ही राजे झालो खरं, पण शाहू राजांची माया आगळीच होती’, असे सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

Web Title: Progressive thinking can revive the awakening: Baba Adhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.