टंचाई कृती आराखडा तातडीने करण्याचे आदेश

By admin | Published: October 2, 2015 01:02 AM2015-10-02T01:02:04+5:302015-10-02T01:13:45+5:30

राज्य शासनाचे परिपत्रक : ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या तालुक्यांच्या याद्या करणार; पाणीपुरवठ्यास जीपीएस यंत्रणा असलेले टँकर घेणार

Order for scarcity action plan | टंचाई कृती आराखडा तातडीने करण्याचे आदेश

टंचाई कृती आराखडा तातडीने करण्याचे आदेश

Next

कोल्हापूर : राज्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन २०१५-१६ साठीचा टंचाई कृती आराखडा शासनास तातडीने सादर करण्याच्या सूचना राज्य शासनाने खास परिपत्रकाद्वारे गुरुवारी दिल्या. ज्या तालुक्यांत सरासरी ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे व जिथे पाण्याची पातळी सरासरीपेक्षा दोन मीटरने खालावली आहे, अशा तालुक्यांच्या याद्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव शांताराम कुदळे यांनी परिपत्रक काढले आहे. टँकरने पाणीपुरवठा करताना गैरव्यवहार होऊ नये, यासाठी त्या टँकरवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात यावी व असेच टँकर भाड्याने घ्यावेत, असेही या आदेशात म्हटले आहे.

शासनाच्या सूचना
पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासून ५०० मीटर अंतरामध्ये पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनाव्यतिरिक्त कोणत्याही विहिरीच्या खोदकामास मनाई.
पाणीटंचाई निवारणार्थ प्रस्तावित किमान खर्चाच्या योग्य उपाययोजना घेण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी.
पाण्याचे स्रोत बळकट करण्यासाठी शिवकालीन पाणी साठवण योजना राबविण्यास प्राधान्य.
जलस्वराज्य व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून सुरू असलेल्या योजना तातडीने पूर्ण करा.
जिल्ह्यातील सर्व विंधन विहिरींची दुरुस्ती करा.
टंचाई निवारण उपाययोजनांची निवड करताना ती उपलब्ध माहिती, टंचाईचा कालावधी व स्थानिक परिस्थितीचा विचार करता किमान खर्चाची असावी, याची दक्षता घ्या. टंचाई कृती आराखड्याचे नियंत्रण जिल्हाधिकारी यांच्याकडे असेल.
बैलगाडी व टँकरने पाणीपुरवठा करताना शासकीय टँकरचाच वापर करा. जिल्हाधिकारी जेव्हा विविध विभागांकडे टँकरची मागणी करतात, त्यावेळी वापरात नसलेले टँकर पुरविले जातात. त्यामुळे खासगी टँकर भाड्याने घेणे भाग पडते. त्यामुळे सर्व विभागांनी टँकर आतापासूनच सुस्थितीत ठेवावेत.
४विहीत आर्थिक व भौतिक निकषांमध्ये न बसणारे प्रस्तावही सबळ कारण व सुस्पष्ट शिफारशींसह शासनाला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Order for scarcity action plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.