ओवेसी, प्रकाश आंबेडकर यांचा कोल्हापुरात १२ रोजी महामेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 06:02 PM2019-01-29T18:02:48+5:302019-01-29T18:09:14+5:30

कोल्हापूर येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगळवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी  दुपारी ३ वाजता शिवाजी स्टेडियम येथे सत्ता संपादन महामेळाव्याचे आयोजन केले आहे. महामेळाव्याला भारिपचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी हे मार्गदर्शन करणार आहेत. महामेळाव्यात लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आघाडीचे प्रा. सुकुमार कांबळे यांनी मंगळवारी दुपारी पत्रकार परिषदेत दिली.

Oakesi, Prakash Ambedkar will meet on 12th May in Kolhapur | ओवेसी, प्रकाश आंबेडकर यांचा कोल्हापुरात १२ रोजी महामेळावा

ओवेसी, प्रकाश आंबेडकर यांचा कोल्हापुरात १२ रोजी महामेळावा

Next
ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर, ओवेसी यांचा कोल्हापुरात १२ ला महामेळावावंचित बहुजन आघाडी : शिवाजी स्टेडियममध्ये सत्ता संपादन महामेळावा

कोल्हापूर : येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगळवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी  दुपारी ३ वाजता शिवाजी स्टेडियम येथे सत्ता संपादन महामेळाव्याचे आयोजन केले आहे. महामेळाव्याला भारिपचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी हे मार्गदर्शन करणार आहेत. महामेळाव्यात लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आघाडीचे प्रा. सुकुमार कांबळे यांनी मंगळवारी दुपारी पत्रकार परिषदेत दिली.

मेळाव्यासाठी लक्ष्मण माने, इम्तियाज जलील, वारीस पठाण, हरिभाऊ भदे, डॉ. दशरथ मांडे, अशोकराव सोनोने, बळीराम शिरस्कर, प्रा. सुकुमार कांबळे, अस्लम सयद, बबनराव कावडे, दिगंबर सकट, सुनील गोटखिंडे हे उपस्थित राहणार आहेत.

या वंचित बहुजन विकास आघाडीमध्ये सुमारे १५० हून अधिक पक्ष, संघटना यांचा समावेश असल्यामुळे मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, अशीही माहिती प्रा. कांबळे यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे वंचित बहुजन आघाडीतर्फे १२ जागांची मागणी केली आहे, त्याबाबत  बुधवारपर्यंत त्यांनी निर्णय न दिल्यास आम्ही स्वतंत्रपणे ४८ जागांवर निवडणूक लढविणार असल्याचेही प्रा. कांबळे यांनी सांगितले.
 

 

Web Title: Oakesi, Prakash Ambedkar will meet on 12th May in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.