सामुदायिक विवाह सोहळ्यातून नवे विचार --राहुल चव्हाण : श्रम, वेळ, पैसा वाचणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:41 AM2018-04-20T00:41:56+5:302018-04-20T00:42:34+5:30

पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच धर्मादाय आयुक्त कार्यालय व सामुदायिक विवाह सोहळा समितीतर्फे रविवारी (दि. ६ मे) कोल्हापुरातील पेटाळा मैदान, खरी कॉर्नर येथे सर्वधर्मीय, सर्वजातीय, आंतरजातीय असा ‘सामुदायिक विवाह सोहळा’

New thoughts on community marriage: Rahul Chavan: Labor, time, money will be spent and social activities | सामुदायिक विवाह सोहळ्यातून नवे विचार --राहुल चव्हाण : श्रम, वेळ, पैसा वाचणार

सामुदायिक विवाह सोहळ्यातून नवे विचार --राहुल चव्हाण : श्रम, वेळ, पैसा वाचणार

Next
ठळक मुद्देपश्चिम महाराष्ट्रात प्रथमच धर्मादाय आयुक्त कार्यालय व सामुदायिक विवाह सोहळा समितीतर्फे रविवारी (दि. ६ मे) कोल्हापुरातील पेटाळा मैदान, खरी कॉर्नर येथे सर्वधर्मीय, सर्वजातीय, आंतरजातीय असा ‘सामुदायिक विवाह सोहळा’

पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच धर्मादाय आयुक्त कार्यालय व सामुदायिक विवाह सोहळा समितीतर्फे रविवारी (दि. ६ मे) कोल्हापुरातील पेटाळा मैदान, खरी कॉर्नर येथे सर्वधर्मीय, सर्वजातीय, आंतरजातीय असा ‘सामुदायिक विवाह सोहळा’ आयोजित केला आहे. अशा प्रकारचा सोहळा प्रथमच होत आहे. या सोहळ्यात अनेक जाती-धर्माच्या मुला-मुलींचे विवाह होणार आहेत. त्यातून श्रम, वेळ, पैसा वाचणार आहे. शिवाय पावित्र्य, आनंद आणि विशेष म्हणजे सर्व समाजाच्या शुभेच्छा वधू-वरांना मिळणार आहेत. या सोहळ्याकरिता खऱ्या अर्थाने ‘चॅरिटी’ शब्दाचा अर्थ समाजापुढे नेण्याचे काम धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्यावतीने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सहायक धर्मादाय आयुक्त राहुल चव्हाण यांच्याशी साधलेला हा थेट संवाद.


प्रश्न : कोल्हापुरात प्रथमच अशाप्रकारे सामुदायिक विवाह सोहळ्याची संकल्पना कशी पुढे आली ?
उत्तर : गेल्या काही वर्षांपासून राज्यात शेतकºयांच्या आत्महत्या ही बाब चिंतेची बनली आहे. त्यामुळे या आत्महत्यांपाठीमागे काय कारणे आहेत. याचा शोध घेतला असता त्यातील प्रमुख एक कारण मुलीच्या लग्नासाठी काढलेले कर्ज होते. त्यात दुष्काळी स्थितीमुळे वेळेत कर्ज फेडणे त्या शेतकºयांना मुश्किलीचे बनले. त्यातून बँकांचा व सावकारांचा तगादा. अशा विचित्र परिस्थितीत सापडलेल्या शेतकºयांना जगणे सुसह्य व्हावे. या सर्वांचा अभ्यास करून अशा शेतकºयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील व राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या संकल्पनेतून राज्यात सर्वत्र सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार कोल्हापुरातील पेटाळा मैदान, खरी कॉर्नर येथे रविवारी (दि. ६ मे ) सर्वधर्मीय, सर्वजातीय, आंतरजातीय ‘सामुदायिक विवाह सोहळा’ आयोजित केला आहे.
प्रश्न : पश्चिम महाराष्ट्रात अशी परिस्थिती नसताना सोहळ्याचे नियोजन का ?
उत्तर : मराठवाडा, विदर्भ, बीड, उस्मानाबाद, बार्शी, आदी दुष्काळग्रस्त भागातून मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी सधन समजल्या जाणाºया पश्चिम महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच वर्षांपासून स्थलांतर केले आहे. त्या शेतकºयांना दिलासा मिळावा. त्यातून असे जे शेतकरी आहेत त्यांच्या मुलींचे विवाह व्हावेत. या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन केले आहे. याशिवाय ज्या व्यक्तींना किंवा पालकांना एक समाजोपयोगी पाऊल व नव्या विचाराने जीवनाची सुरुवात करायची आहे. अशा ऐपत असणाºया किंवा गरीब, श्रीमंत कुटुंबातील मुला-मुलींनाही या विवाह सोहळ्यात सहभागी होता येईल.
प्रश्न : पालकांनी नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे सादर करावीत.
उत्तर : या सोहळ्यात सहभागी होणाºया वधूचे वय १८ व वराचे वय २१ पूर्ण असल्याचा दाखला. वधू-वराचे डोमिसाईल प्रमाणपत्र, दोघांचे आयकार्ड साईज फोटो. वधू-वरांच्या आई-वडिलांचा तलाठी यांच्याकडील रहिवासी दाखला. जातीचे दाखले. हा केवळ सोहळा विशिष्ट समाजाकरिता अथवा जातीकरिता नसून सर्वधर्मीय व सर्वजातीय यांच्याकरिता आयोजित केला आहे. यासह अन्य काही शंका असतील तर अशा पालकांनी किंवा स्वत: वधू-वरांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या वसंत प्लाझा, तिसरा मजला, बागल चौक, कोल्हापूर येथील कार्यालयाशी संपर्क साधावा.
प्रश्न : या सोहळ्याचे वैशिष्ट्ये काय असणार आहे ?
उत्तर : या सोहळ्यात विवाह करणाºया वधू-वरांना मग तो कुठल्याही जाती-धर्माचा किंवा गरीब, श्रीमंत असो. वधूला मणीमंगळसूत्र, वधू-वरांना पेहराव, संसारोपयोगी भांड्यांचा सेट, गादी सेट, दोन महिन्यांचे धान्य, वधू-वरांच्या संयुक्त नावे मुदतबंद ठेव, आपआपल्या रीतिनुसार विवाहाची सुविधा, वºहाडी मंडळींसह मोफत जेवण, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, विवाह मंडप, आदी सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत.
प्रश्न : कार्यालयाच्या व्यस्त कामकाजातून असे उपक्रम वर्षभर राबविणार का ?
उत्तर : हो राबविणार आहोत. कारण आमच्या कार्यालयाने झिरो पेंडन्सी अंतर्गत कामकाज ज्या-त्या वेळी निकालात काढले आहे. त्यातून मागील शेष कामकाज राहिलेले नाही. धर्मादाय अर्थात विश्वस्त (चॅरिटी) असा अर्थ आमच्या कार्यालयाचा होतो. त्यामुळे आमच्या कार्यालयाच्यावतीने असे उपक्रम मिळालेल्या वेळेचा सदुपयोग म्हणून राबविले जात आहेत. ६ मे रोजी होणारा हा सोहळा म्हणजे कार्यालयातर्फे राबविण्यात आलेला पहिलाच उपक्रम नाही. तर यापूर्वी राज्य परिवहन महामार्ग विभाग (एस. टी)च्या वाहक, चालकांच्याकरिता आरोग्य शिबिर आयोजित केले होते. त्यातून अनेक वाहक, चालक यांच्या आरोग्याशी निगडित प्रश्नांवर भर दिला. विशेषत: महिला वाहक, कर्मचाºयांचे प्रश्न गंभीर होते हेही शिबिराच्या माध्यमातून समोर आले आहेत. यासह मागील महिन्यात सीपीआर रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया हा उपक्रमही राबविण्यात आला. विशेष म्हणजे अशा शस्त्रक्रिया २०१३ पासून झालेल्या नव्हत्या. त्या झाल्याने अनेक बालकांना जीवदान मिळाले. असे समाजोपयोगी उपक्रम या भविष्यात कार्यालयाच्यावतीने राबविले जाणार आहेत.
प्रश्न : सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी समिती स्थापन केली आहे का?
उत्तर : हो, यासाठी विवाह सोहळा समितीची स्थापना केली आहे. त्याचे अध्यक्ष राहुल चिकोडे आहेत, तर नंदकुमार मराठे, अ‍ॅड. समृद्धी माने, सुप्रिया ताडे, विजयसिंह डोंगळे हे सदस्य म्हणून काम पाहत आहेत. यासह नियमितपणे धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पवार व सहायक आयुक्त रामदास वाबळे यांचे सहकार्य लाभत आहे.
- सचिन भोसले

 

Web Title: New thoughts on community marriage: Rahul Chavan: Labor, time, money will be spent and social activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.