पर्यटनासाठी विदेशाकडे वाढता कल- हौशी कोल्हापूरकर : वर्षाला दोन हजार जण ‘सहलीवर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 01:16 AM2018-05-18T01:16:24+5:302018-05-18T01:16:24+5:30

Moving to foreign countries for tourism- Kshalivar: | पर्यटनासाठी विदेशाकडे वाढता कल- हौशी कोल्हापूरकर : वर्षाला दोन हजार जण ‘सहलीवर’

पर्यटनासाठी विदेशाकडे वाढता कल- हौशी कोल्हापूरकर : वर्षाला दोन हजार जण ‘सहलीवर’

googlenewsNext
ठळक मुद्देपरदेशवारी सर्वसामान्यांच्या आवाक्यात

कोल्हापूर : उन्हाळ््याची सुटी लागली की सगळ्यांना मामाच्या गावी जायची ओढ असायची. आता या मामाच्या गावची जागा सिंगापूर, मलेशिया, थायलंड आणि युरोप भ्रमंतीने घेतली आहे. सुटीच्या चार ते पाच महिन्यांच्या कालावधीत कोल्हापुरातून सुमारे दोन हजार पर्यटक परदेशात जात असून दरवर्षी या संख्येत वाढच होत आहे.

उन्हाळ््याची सुटी म्हणजे लहान मुलांसोबत पालकांसाठीही ‘फूल टू धम्माल’ करण्याचे दिवस. काही वर्षांपूर्वीपर्यंत ही सुटी फार तर मामाच्या गावी किंवा अन्य नातेवाइकांकडेच घालविली जायची, फार-फार तर देशातल्याच एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी काही दिवस घालविले जातात. आता मात्र ठरवून, नियोजनपूर्वक सुटी घालवली जाते. एक काळ असा होता की परदेश प्रवास फार मोठी गोष्ट असायची. परदेशात जावून आलेल्यांकडे उत्सुकतेने पाहिजे जायचे. आता सर्वसामान्यांच्या परदेश पर्यटन आवाक्यात आले आहे.

जगभरात पर्यटन उद्योगाला महत्त्व आले असून पर्यटनवृद्धीसाठी अनेक देशांनी पासपोर्टच्या अटी शिथील केल्या आहेत, शिवाय पर्यटकांना कराव्या लागणाऱ्या खर्चात कपात केली आहे. त्यामुळे परदेशात जायचे म्हणजे गाठीशी खूप पैसा असण्याची आता गरज नाही. फिरण्याची आवड, आर्थिक समृद्धता, ‘परदेश टूर अरेंज’ करणाºया कंपन्यांकडून दिल्या जाणाºया सेवा-सुविधांमुळे गेल्या तीन-चार वर्षांत कोल्हापूरकर उन्हाळी सुटीत परदेश पर्यटनाला प्राधान्य देत आहेत.

प्रारंभ सिंगापूरपासून
भारतातील पर्यटनस्थळे पाहिल्यानंतर परदेश पर्यटनाचा विचार करताना सुरुवात होते सिंगापूर, मलेशिया, थायलंड, पटाया या देशांपासून. जंगल सफारीसाठी प्रसिद्ध असलेल्या देशांमधील वातावरण, जीवनशैली, संस्कृतीशी जुळवून घेणे सोपे जाते. या टूरच्या अनुभवानंतर बाली, आॅस्ट्रीया, दुबईची वारी केली जाते. या देशांच्या भ्रमंतीनंतर युरोपला पसंती दिली जाते. त्यातील स्वीत्झर्लंड, पॅरिस, लंडन, फ्रान्सचे सर्वाधिक आकर्षण आहे.

बजेटनुसार नियोजन
परदेशवारीसाठी खूप पैसे लागतात ही स्थिती आता बदलली आहे. परदेश पर्यटन कमीत कमी ५० ते ७५ हजारांपासून ते अगदी ५ ते १० लाखांपर्यंतसुद्धा होते. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांनाही परदेश भ्रमंती सहजशक्य झाली आहे. तुमच्या बजेटनुसार टूर कंपन्या सहलींचे नियोजन करतात. त्याप्रमाणे सोयी-सुविधा दिल्या जातात.
 

युरोपमधील शिस्त, स्वच्छता, देशाप्रती अभिमान, जपलेला निसर्ग आणि संस्कृती या सगळ्या गोष्टी आम्हाला जवळून अनुभवायच्या होत्या. या देशांना फार मोठा इतिहास लाभला आहे, तो जाणून घेण्याच्या उत्सुकतेने यंदा आम्ही जर्मनी, फ्रान्स, इटली, स्वीत्झर्लंड या चार देशांच्या सहलीवर जात आहोत. - तनुजा शिपूरकर (सामाजिक कार्यकर्त्या)

आता मध्यमवर्गीय कुटुंबांचाही आर्थिक स्तर वाढल्याने परदेश पर्यटनाला प्राधान्य दिले जाते. सहलीचे नियोजन कंपनीकडून केले जात असल्याने एकदा पैसे भरले की सर्व सोयी मिळतात. ग्रुपने सहल होत असल्याने भाषेची अडचण येत नाही.
- बी. व्ही. वराडे (ट्रेड विंग्ज)
युरोप पाहणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. एका सहलीत आणि दीड ते दोन लाखात किमान दोन-तीन देश पाहण्याचे स्वप्न पूर्ण होत असल्याने नागरिकांची खर्च करायची तयारी आहे. त्यात तरुणाईबरोबरच वयस्कर व्यक्तींचीही संख्या मोठी आहे.
- रवी शर्मा (सफर टूर्स)

पारंपरिक मानसिकता बदलून लोक स्वत:च्या जगण्याचा आनंद घेऊ लागले आहेत. अशा सहलींसाठी कर्ज सुविधा असल्याने खिशात पैसा असलाच पाहिजे असेही नाही. त्यामुळे आर्थिक ताण येत नाही.
-नंदिनी खुपेरकर (गगन टूर्स)
 

Web Title: Moving to foreign countries for tourism- Kshalivar:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.