महाराष्ट क्रांती सेना लोकसभा, विधानसभा लढविणार : सुरेश पाटील यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 04:19 PM2018-11-19T16:19:57+5:302018-11-19T16:20:45+5:30

नव्यानेच स्थापन झालेला महाराष्टÑ क्रांती सेना पक्ष राज्यातील लोकसभेच्या ४८ व विधानसभेच्या २८८ जागांवर निवडणूक लढविणार आहे, अशी घोषणा पक्षप्रमुख सुरेश पाटील यांनी सोमवारी येथे केली.

Maharashtra Kranti Sena will fight Lok Sabha, Vidhan Sabha: Suresh Patil's announcement | महाराष्ट क्रांती सेना लोकसभा, विधानसभा लढविणार : सुरेश पाटील यांची घोषणा

महाराष्ट क्रांती सेना लोकसभा, विधानसभा लढविणार : सुरेश पाटील यांची घोषणा

Next
ठळक मुद्दे पेठवडगाव येथे २५ नोव्हेंबरला कार्यकर्ता मेळावा

कोल्हापूर: नव्यानेच स्थापन झालेला महाराष्टÑ क्रांती सेना पक्ष राज्यातील लोकसभेच्या ४८ व विधानसभेच्या २८८ जागांवर निवडणूक लढविणार आहे, अशी घोषणा पक्षप्रमुख सुरेश पाटील यांनी सोमवारी येथे केली. पक्षाचा पहिला मेळावा २५ नोव्हेंबरला पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथे होईल, असेही त्यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, रायरेश्वर मंदिरात पक्षाची स्थापना केली आहे. पक्षाचे मुख्य संस्थापक उदयनराजे भोसले असून, पक्षाला वेगळे वलय मिळाले आहे. पेठ वडगाव येथील मेळाव्यानंतर राधानगरी, भुदरगड, चंदगड येथेही मेळावे होतील. मतदारांना हा पक्ष तिसरा सक्षम पर्याय वाटत आहे. पक्षाकडे उमेदवारीसाठी मागणी होऊ लागल्याने लोकसभा, विधानसभा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली नाही तर ते क्रांती सेनेकडून निवडणूक रिंगणात असतील.

यावेळी मदन चव्हाण, परेश भोसले, उदय लाड, जयदीप शेळके, प्रा. शिवाजी लोंढे, राहुल इंगवले, राणी पाटील,भरत पाटील, चंद्रकांत पाटील,मारुती जांभळे, पूजा पाटील, सुजाता खाडे उपस्थित होते.
 

Web Title: Maharashtra Kranti Sena will fight Lok Sabha, Vidhan Sabha: Suresh Patil's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.