Lok Sabha Election 2019 : मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुखांच्या स्वागताला गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 07:48 PM2019-03-24T19:48:51+5:302019-03-24T19:52:19+5:30

भाजप-शिवसेना युतीच्या प्रचार प्रारंभानिमित्त कोल्हापुरात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागताला रविवारी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गर्दी केली.

Lok Sabha Election 2019 Chief Minister, Shiv Sena party chiefs welcome crowd | Lok Sabha Election 2019 : मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुखांच्या स्वागताला गर्दी

कोल्हापुरात रविवारी भाजप-शिवसेना युतीच्या प्रचार प्रारंभानिमित्त कोल्हापुरात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गर्दी केली.

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुखांच्या स्वागताला गर्दीविमानतळावर पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती

कोल्हापूर : भाजप-शिवसेना युतीच्या प्रचार प्रारंभानिमित्त कोल्हापुरात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागताला रविवारी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गर्दी केली.

मुंबईहून दुपारी चारच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजप प्रदेशाअध्यक्ष रावसाहेब दानवे, वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार, आदी कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. त्यांचे स्वागत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

यावेळी भाजपचे जिल्हा संघटनमंत्री बाबा देसाई, जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, आदी उपस्थित होते. दरम्यान, दुपारी तीनच्या सुमारास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री अनंत गीते, सेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे,आदी विमानतळावर आले. त्यांचे स्वागत शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक, धैर्यशील माने यांनी केले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, युवासेनेचे हर्षल सुर्वे, आदी उपस्थित होते. विमानतळावरुन हॉटेल सयाजी येथे पहिल्यांदा शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे आले. त्यानंतर अंबाबाई मंदिरात दर्शन घेऊन याठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस आले. या दोन्ही नेत्यांना भेटण्यासाठी त्यांच्या पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी याठिकाणी गर्दी केली.

 

 

Web Title: Lok Sabha Election 2019 Chief Minister, Shiv Sena party chiefs welcome crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.