कोल्हापूरात देशापरदेशातील पतंग, मांजाचे प्रदर्शन शनिवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 03:08 PM2018-11-03T15:08:12+5:302018-11-03T15:09:39+5:30

कोल्हापूर : छत्रपती राजर्षी शाहू प्रतिष्ठान व पैलवान बाबा राजेमहाडीक पतंग प्रेमी गु्रपतर्फे यंदा प्रथमच देशासह परदेशातील विविध आकाराचे ...

Kotha, khanga, Manjara exhibition in Kolhapur will start from Saturday | कोल्हापूरात देशापरदेशातील पतंग, मांजाचे प्रदर्शन शनिवारपासून

कोल्हापूरात देशापरदेशातील पतंग, मांजाचे प्रदर्शन शनिवारपासून

Next
ठळक मुद्देदेशापरदेशातील पतंग, मांजाचे प्रदर्शन शनिवारपासूनबाबा राजेमहाडीक पतंग प्रेमी व लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू प्रतिष्ठानचा उपक्रम

कोल्हापूर : छत्रपती राजर्षी शाहू प्रतिष्ठान व पैलवान बाबा राजेमहाडीक पतंग प्रेमी गु्रपतर्फे यंदा प्रथमच देशासह परदेशातील विविध आकाराचे पतंग व सुती मांज्या दोरा यांचे शनिवारी(दि.१०) व रविवारी (दि.११)दरम्यान महालक्ष्मी धर्मशाळा हॉल येथे आयोजित केले आहे. अशी माहीती पैलवान बाबा राजेमहाडीक यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या प्रदर्शनाची सुरूवात शनिवारी सकाळी १० वाजता पतंग रॅलीने होणार आहे. ही रॅली महालक्ष्मी धर्मशाळेपासून साकोली कॉर्नर, उभा मारूती चौक- बिनखांबी गणेश मंदीर, अंबाबाई मंदीर मार्गे पुन्हा महालक्ष्मी धर्मशाळा असा राहील. त्यानंतर या प्रदर्शनाचे उदघाटन महापौर शोभा बोंद्रे, माजी महापौर हसिना फरास, यौवराज यशराजराजे यांच्या उपस्थित होईल.

यावेळी पृथ्वीराज महाडीक, ऋतुराज क्षीरसागर आदी उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनात मॉरिशस, स्वित्झलँड, हाँगकॉग, बिजींग, दुबई, मलेशिया, सिंगापूर येथील पतंग, तर सुरत, अहमदाबाद, हैदराबाद, औंरगाबाद, पुणे, मुंबई, दिल्ली, पाटणा, बरेली, नाशिक, येवला येथील सुती मांजा दौरा पाहण्यास मिळणार आहे. यावेळी जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील, राजू सावंत, आदी उपस्थित होते.
 

 

Web Title: Kotha, khanga, Manjara exhibition in Kolhapur will start from Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.