कोल्हापूर  : दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी ‘टॅब’चे वाटप करणार : राजेश क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 05:52 PM2018-06-28T17:52:22+5:302018-06-28T17:58:22+5:30

शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवर पडणारा दप्तराचा भार त्यांच्या कोवळ्या शरीराला न पेलवणारा असल्याने, युवा सेना अध्यक्ष आदित्यजी ठाकरे यांनी मुंबईमधील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासाठी टॅब वाटप केले, त्याच धर्तीवर पुढील काळात शहरातील विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्याकरिताशालेय विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्याचा उपक्रम हाती घेणार, असे प्रतिपादन गुरुवारी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.

Kolhapur: Will distribute 'Tab' to reduce the burden of Dapra: Rajesh Kshirsagar | कोल्हापूर  : दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी ‘टॅब’चे वाटप करणार : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर  : दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी ‘टॅब’चे वाटप करणार : राजेश क्षीरसागर

Next
ठळक मुद्देदप्तराचे ओझे कमी करण्यासाठी ‘टॅब’चे वाटप करणार : राजेश क्षीरसागरआमदार फंडातून शाळांना संगणक वाटप

कोल्हापूर  : शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवर पडणारा दप्तराचा भार त्यांच्या कोवळ्या शरीराला न पेलवणारा असल्याने, युवा सेना अध्यक्ष आदित्यजी ठाकरे यांनी मुंबईमधील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासाठी टॅब वाटप केले, त्याच धर्तीवर पुढील काळात शहरातील विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्याकरिताशालेय विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्याचा उपक्रम हाती घेणार, असे प्रतिपादन गुरुवारी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.

राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या स्थानिक विकास निधीतून कोल्हापूर शहरातील पाच शाळांना संगणक व प्रिंटरचे वाटप करण्यात आले. क्षीरसागर म्हणाले, मुले ही उज्ज्वल देशाचे भवितव्य असून, त्यांच्यावर कोणतेही दडपण न आणता त्यांच्या मनावर सुसंस्कार घडविण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

‘शिवचरित्र’ या विषयावर बोलताना इतिहास संशोधक डॉ. अमर आडके म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभे न करता सुराज्य उभे केले. पालकांना मुलांना कसे घडवायचे याचे मार्गदर्शन ‘शिवचरित्रा’मधून होते. विद्यार्थ्यांनी आपला इतिहास जपावा, संस्कृती वाढवावी, असे आवाहन केले.

यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नांतून मुख्यमंत्री सहायता निधीतून गरजू १५ रुग्णांना मंजूर करण्यात आलेल्या निधी धनादेशाचे वितरणही करण्यात आले.

याप्रसंगी माजी उपमहापौर उदय पोवार, माजी स्थायी समितीचे सभापती सुनील मोदी, ‘जनता बझार’चे स्वीकृत सदस्य जयवंत हारुगले, महिला आघाडी शहरप्रमुख मंगलताई साळोखे, अरुण सावंत, पद्माकर कापसे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष किशोर घाटगे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाच शाळांना संगणकाचे वाटप

यानंतर शहरातील आयर्विन ख्रिश्चन इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, तवनाप्पा पाटणे हायस्कूल, राजारामपुरी, महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल, भवानी मंडप, कोल्हापूर आदर्श विद्यालय, साकोली कॉर्नर, विद्यामंदिर श्री दत्ताबाळ मिशन डिव्हाईन संचलित दत्ताबाळ विद्यामंदिर या शाळांना संगणक संचाचे वितरण आमदार राजेश क्षीरसागर आणि डॉ. अमर आडके यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
 

 

Web Title: Kolhapur: Will distribute 'Tab' to reduce the burden of Dapra: Rajesh Kshirsagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.