कोल्हापूर : वीज जोडणीसाठी लाच मागितल्याप्रकरणी रणजित पाटील अखेर निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:15 PM2018-03-15T12:15:15+5:302018-03-15T12:15:15+5:30

वीज जोडणी मंजुरीसाठी कार्यकारी अभियंत्यांकडे अर्ज लवकर पाठविण्यासाठी २५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी एसीबीच्या जाळ्यात सापडलेले रणजित बाळासाहेब पाटील याला निलंबित करण्यात आले.

Kolhapur: Ranjeet Patil finally suspended for bribe for electricity connection | कोल्हापूर : वीज जोडणीसाठी लाच मागितल्याप्रकरणी रणजित पाटील अखेर निलंबित

कोल्हापूर : वीज जोडणीसाठी लाच मागितल्याप्रकरणी रणजित पाटील अखेर निलंबित

Next
ठळक मुद्देवीज जोडणीसाठी लाच मागितल्याप्रकरणी रणजित पाटील निलंबितमहावितरणची कारवाई. इचलकरंजीतील प्रकार

कोल्हापूर : वीज जोडणी मंजुरीसाठी कार्यकारी अभियंत्यांकडे अर्ज लवकर पाठविण्यासाठी २५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी एसीबीच्या जाळ्यात सापडलेले रणजित बाळासाहेब पाटील याला निलंबित करण्यात आले.

कोल्हापूर परिमंडल विभागाने त्याच्यावर सोमवारी (दि. १२) ही कारवाई केली असून, महिन्यातून दोन वेळा सोमवारी व गुरुवारी गडहिग्लज विभागीय कार्यालयात हजेरी देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

रणजित पाटील राज्य विद्युत वितरण कंपनीच्या इचलकरंजी कार्यालयात उपकार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होता. शासकीय ठेकेदार उमेश माळी यांच्याकडून पाटीलने दोन सदनिकेसह एक आस्थापना व एक घरगुती अशा चार वीज जोडण्यांसाठी संबंधित कार्यालयाकडे मागणी केली होती.

सहा महिने झाले तरी मंजुरी मिळत नसल्याने माळी यांनी पाटीलची भेट घेतली असता त्याने चार कामांसाठी २७ हजार रुपयांची मागणी माळी यांच्याकडे केली. तडजोडीअंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार माळी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

त्यांनी ८ मार्चला दुपारी इचलकरंजी येथील स्टेशन रोडवरील कार्यालयात ‘एसीबी’ने सापळा लावून पाटील याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर पोलीस कारवाई झाली.


महावितरण कंपनीने ‘एसीबी’च्या अहवालानुसार पाटीलच्या निलंबनाची कारवाई केली. सोमवारी (दि. १२) कोल्हापूर परिमंडल विभागाने निलंबनाचे आदेश दिले. महिन्यातून दोन वेळा सोमवार व गुरुवारी गडहिग्लज विभागीय कार्यालयात हजेरी द्यावी लागणार आहे.

मूळ वेतनात ५० टक्केकपात

निलंबनाच्या कारवाईनंतर महावितरणच्या नियमानुसार रणजित पाटीलच्या मूळ वेतनात ५० टक्के कपात होणार आहे. इतर भत्ते मात्र नियमित राहणार आहेत.
 

 

Web Title: Kolhapur: Ranjeet Patil finally suspended for bribe for electricity connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.