कोल्हापूर : नेसरीत मच्छी व्यावसायिकांकडून पोलीसास धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 06:21 PM2018-05-24T18:21:18+5:302018-05-24T18:21:18+5:30

नेसरी ता. गडहींग्लज येथे आज आठवडा बाजारात वाहतूक शिस्त लावण्यासाठी गेलेल्या पोलीसाला ३ मच्छी व्यावसायिकांनी शिविगाळ व धक्का बुक्की केली. अशी फिर्याद स्वतः महेश दत्ताञय बांगर या पोलीसाने नेसरी पोलीसात दिली आहे.

Kolhapur: Polisas Chakkabukki from Nasrishi Mosquito Professionals | कोल्हापूर : नेसरीत मच्छी व्यावसायिकांकडून पोलीसास धक्काबुक्की

कोल्हापूर : नेसरीत मच्छी व्यावसायिकांकडून पोलीसास धक्काबुक्की

Next
ठळक मुद्दे नेसरीत मच्छी व्यावसायिकांकडून पोलीसास धक्काबुक्की

नेसरी : नेसरी ता. गडहींग्लज येथे आज आठवडा बाजारात वाहतूक शिस्त लावण्यासाठी गेलेल्या पोलीसाला ३ मच्छी व्यावसायिकांनी शिविगाळ व धक्काबुक्की केली. अशी फिर्याद स्वतः महेश दत्ताञय बांगर या पोलीसाने नेसरी पोलीसात दिली आहे.

अधिक माहिती अशी, पोलीस बांगर हे नेसरी - गावठाण मार्गावर पेट्रोलींग करीत असता आठवडा बाजारात मसणाईदेवी मंदिर परिसरात मच्छी विकणारे व्यावसायिक असिफ मस्तान बोजगार, जरउद्दीन मस्तान बोजगार व रमेजा मस्तान बोजगार सर्व रा. गडहींग्लज या तिघांना आपली रोडवरील दुकाने मागे घ्या वाहतुकीस अडथळा होत आहे, असे सांगत असताना तुम्ही कोण सांगणारे म्हणत बांगर या पोलीसाला धक्काबुक्की व शिविगाळ केली. तसेच त्यांच्या खाकी वर्दीची कॉलर फाडून जीवे मारण्याची धमकी दिली.

दुपारी 12 च्या सुमारास हा प्रकार घडला. वरिल तिन्ही व्यावसायिकांच्या विरोधात नेसरी पोलीसात सरकारी कामात अडथळा व मारहाण संदर्भात गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title: Kolhapur: Polisas Chakkabukki from Nasrishi Mosquito Professionals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.