कोल्हापूर - मुंबई ‘शिवशाही’ दसºयाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 06:05 PM2017-09-27T18:05:51+5:302017-09-27T18:07:10+5:30

एस. टी. महामंडळाची अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज, वातानुकूलित ‘शिवशाही’ बसला कोल्हापूरकरांनी आपलीशी केल्यानेच पुणे पाठोपाठ आता, कोल्हापूर - मुंबई ही गाडी दसºयांच्या मुहूर्तावर सुरु होत आहे. कोल्हापूर - पुणे मार्गावर शिवशाही गाडीला मिळलेला प्रतिसाद पाहता ही गाडी आता दर तासाला धावणार आहे. कोल्हापूर - रत्नागिरी अशी ही गाडी सुरु झाली आहे.

Kolhapur - Mumbai 'Shivshahi' is 10º | कोल्हापूर - मुंबई ‘शिवशाही’ दसºयाला

कोल्हापूर - मुंबई ‘शिवशाही’ दसºयाला

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूर-पुणे आता तासला रत्नागिरी- कोल्हापूरही सुरुपुशबॅक सीटस, वाय - फाय, फुल्ली एअरकंडिशन्ड, फायर डिटेक्टिंग सिस्टीम, मोबाईल चार्जिंग सेवा उपलब्ध

कोल्हापूर : एस. टी. महामंडळाची अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज, वातानुकूलित ‘शिवशाही’ बसला कोल्हापूरकरांनी आपलीशी केल्यानेच पुणे पाठोपाठ आता, कोल्हापूर - मुंबई ही गाडी दसºयांच्या मुहूर्तावर सुरु होत आहे. कोल्हापूर - पुणे मार्गावर शिवशाही गाडीला मिळलेला प्रतिसाद पाहता ही गाडी आता दर तासाला धावणार आहे. कोल्हापूर - रत्नागिरी अशी ही गाडी सुरु झाली आहे.


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ‘शिवशाही’ या वातानुकूलीत गाडीला कोल्हापूरकारांच्या पसंती उतरली आहे. पुणे पाठोपाठ ही गाडी आता कोल्हापूर - मुंबई या मार्गावर धावणार असल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जाहिर केले आहे. ‘हिरकणी’ म्हणजेच निमआराम प्रकारातील बसच्या तिकिटाच्या जवळपास जाणारेच ‘शिवशाही’ बसचेही तिकीट असल्याने प्रवाशी या गाडीला पहिली पसंती देत आहेत.

अशी आहे गाडी....


‘शिवशाही’ बसमध्ये एकूण ४५ पुश बॅक आसने असून ही बस वातानुकूलित आहे. प्रवाशांच्या मनोरंजनासाठी प्रत्येक सीटला एलसीडी स्क्रीन बसविण्यात आला आहे. सोबतच हेडफोन्सनी एफएम ऐकण्याची सुविधादेखील उपलब्ध असणार आहे. पुशबॅक सीटस, वाय - फाय, फुल्ली एअरकंडिशन्ड, फायर डिटेक्टिंग सिस्टीम, मोबाईल चार्जिंग सेवा यामध्ये उपलब्ध आहे.

कोल्हापूर - मुंबई तिकीट दर

महामंडळाच्या ‘हिरकणी’ म्हणजेच निमआराम बसगाडीचा कोल्हापूर - मुंबई मार्गावरील तिकीट दर ५७९ रुपये, तर शिवशाही बसचे तिकीट ६२० रुपये आहे.

अशी आहे वेळ....

कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक येथून दररोज रात्री १० वा. ही गाडी सुटणार आहे. मुंबई सेंट्रल येथून सुध्दा रात्री १० वा. येथून ही गाडी एकाचवेळी सुटणार आहे.

कोल्हापूर - स्वारगेट आता तासाला

कोल्हापूर-स्वारगेट (पुणे) मार्गावर चार शिवशाही बसगाड्यांमार्फत विनावाहक फेºया करण्यात येत होत्या. या गाडीला मिळालेला प्रतिसाद पाहता या फेर्यात वाढ करून आता प्रत्येक तासाला ही गाडी कोल्हापूर ते पुणे धावणार आहेत. यामध्ये कोल्हापूर विभाग व पुणे विभागांच्या गाड्यांचा समावेश आहे. पहाटे ५,६,सकाळी ७,८,१०,११ वा. दुपारी १२,१,२, ४ वा., सांयकाळी ५,६,७,८ रात्री ९.३० वा., १०.३० वा., ११.३० वा., १२.३० वा. कोल्हापूर - स्वारगेट (पुणे) या मार्गावर सुटणार आहे. त्याच वेळी स्वारगेट (पुणे) वरून कोल्हापूरकडे गाडी येणार आहे. यागाडीने अवघ्या २५ दिवसात चाळीस लाखांचे उत्पन्न मिळविले आहे.

कोल्हापूर - रत्नागिरी सुरु

कोल्हापूर रत्नागिरी या मार्गावरशिवशाही ही बस सेवा सुरु करण्यात आली आहे. ही बस रत्नागिरी वरून सकाळी ९.३० वा. आणि कोल्हापूर वरुन दुपारी २.४५ वा. सुटणार आहे. या ंचा तिकीट दर २२७ रु. आहे.
 

Web Title: Kolhapur - Mumbai 'Shivshahi' is 10º

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.