कोल्हापूर : लिंगायत, ख्रिस्ती बांधवांनी मांडल्या व्यथा, अराफत शेख यांनी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 04:13 PM2018-11-13T16:13:32+5:302018-11-13T16:24:56+5:30

लिंगायत धर्मास अल्पसंख्यांक दर्जा न मिळाल्याने मुलांना शिक्षणाच्या सुविधांसह इतर विकास होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा व्यथा लिंगायत संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष अराफत शेख यांच्यासमोर मांडल्या.

Kolhapur: Lingayat, the suffering caused by Christian brothers, dialogue conducted by Arafat Sheikh | कोल्हापूर : लिंगायत, ख्रिस्ती बांधवांनी मांडल्या व्यथा, अराफत शेख यांनी साधला संवाद

कोल्हापूर : लिंगायत, ख्रिस्ती बांधवांनी मांडल्या व्यथा, अराफत शेख यांनी साधला संवाद

googlenewsNext
ठळक मुद्देलिंगायत, ख्रिस्ती बांधवांनी मांडल्या व्यथा अराफत शेख यांनी साधला संवाद

कोल्हापूर : लिंगायत धर्मास अल्पसंख्यांक दर्जा न मिळाल्याने मुलांना शिक्षणाच्या सुविधांसह इतर विकास होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा व्यथा लिंगायत संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष अराफत शेख यांच्यासमोर मांडल्या.

अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्यपदी ख्रिस्ती व्यक्तीचा समावेश केल्यास समाजाच्या भावना चांगल्या प्रकारे सरकारसमोर मांडता येतील, यासह विविध मागण्यांचे निवेदन ख्रिस्ती युवाशक्तीने दिले. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष शेख यांनी शासकिय विश्रामगृह येथे अल्पसंख्यांक बांधवांशी संवाद साधला.

लिंगायत संघर्ष समितीचे समन्वयक सरला पाटील, बाबूराव तारळी, मिलींद साखरपे यांच्या शिष्टमंडळाने शेख यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. लिंगायत धर्माचे लोक महाराष्ट्रात  अल्पसंख्यांक दर्जा व स्वतंत्र दर्जा मिळण्यासाठी गेली कित्येक वर्षे आंदोलने करत आहेत.

समाजाची लोकसंख्या ही महाराष्ट्रात  अल्प असल्याने राज्यस्तरीय अल्पसंख्यांक दर्जा मिळावा. त्यामुळे समाजातील संस्थांद्वारे मुला-मुलींच्या शिक्षणासाठी अधिक सोयी पुरविता येऊ शकतील. तसेच इतरही समाज विकास केला जाऊ शकतो, त्यामुळे या मागणीचा गांभिर्याने विचार व्हावा, असे या निवेदनात म्हंटले आहे. यावेळी निळकंठ मुगल खोड, विलास आंबोळे, राजशेखर तंबाखे, चंद्रशेखर बटकडली, दत्तात्रय पाटील आदी उपस्थित होते.

ख्रिस्ती युवा शक्तीचे राज्याध्यक्ष राकेश सावंत यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदनाद्वारे मागण्या सादर केल्या. यामध्ये जिल्हानिहाय अल्पसंख्यांक समितीवर सदस्यपदी ख्रिश्चनांची निवड करावी, नवबौध्दांच्या धर्तीवर ख्रिस्ती धर्म स्विकारलेल्यांना नवख्रिस्ती म्हणून मान्यता मिळावी.

गरीब ख्रिस्ती मुलांसाठी शिष्यवृत्ती सुरु करण्यात यावी, स्थानिक स्वराज संस्थांकडून मोफत शवपेटी मिळावी, ख्रिस्ती समाजातील व्यक्तीला विधानपरिषदेवर संधी द्यावी, तसेच स्थानिक स्वराज संस्थेत स्विकृत सदस्य म्हणून घ्यावे अशा मागण्यांचा समावेश आहे. यावेळी संजय बेनाडे, प्रणिता माळी, रमेश भोसले, राम केंगार, नितीन माळी, के. पी. सोनवणे, शम्युवेल परब, ज्योती खोडवे आदी उपस्थित होते.
 

 

Web Title: Kolhapur: Lingayat, the suffering caused by Christian brothers, dialogue conducted by Arafat Sheikh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.