कोल्हापूर :  भूलशास्त्र संघटना देणार प्रथमोपचाराचे धडे : अंजली कद्दू यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 03:12 PM2018-10-20T15:12:38+5:302018-10-20T15:15:24+5:30

एखाद्या व्यक्तीला चक्कर आल्यानंतर आजही अनेक ठिकाणी आपण पारंपरिक उपचार करीत बसतो; परिणामी त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. अशा वेळी प्रथमोपचार काय करावेत, यासाठी भारतीय भूलशास्त्र संघटना, शाखा कोल्हापूरच्या वतीने मंगळवारी (दि. २३) कोल्हापूर शहरातील दहा ठिकाणी प्रशिक्षण केंदे्र घेणार असल्याची माहिती संघटनेच्या अध्यक्षा डॉ. अंजली कद्दू व सचिव डॉ. विनोद भचरानी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Kolhapur: Ignorance organizations will give first aid lesson: Anjali Kadoo | कोल्हापूर :  भूलशास्त्र संघटना देणार प्रथमोपचाराचे धडे : अंजली कद्दू यांची माहिती

कोल्हापूर :  भूलशास्त्र संघटना देणार प्रथमोपचाराचे धडे : अंजली कद्दू यांची माहिती

Next
ठळक मुद्देभूलशास्त्र संघटना देणार प्रथमोपचाराचे धडे  : अंजली कद्दू यांची माहितीमंगळवारी शहरातील दहा ठिकाणी प्रशिक्षण केंद्रे

कोल्हापूर : एखाद्या व्यक्तीला चक्कर आल्यानंतर आजही अनेक ठिकाणी आपण पारंपरिक उपचार करीत बसतो; परिणामी त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. अशा वेळी प्रथमोपचार काय करावेत, यासाठी भारतीय भूलशास्त्र संघटना, शाखा कोल्हापूरच्या वतीने मंगळवारी (दि. २३) कोल्हापूर शहरातील दहा ठिकाणी प्रशिक्षण केंदे्र घेणार असल्याची माहिती संघटनेच्या अध्यक्षा डॉ. अंजली कद्दू व सचिव डॉ. विनोद भचरानी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. अंजली कद्दू म्हणाल्या, आजच्या धगधगीच्या युगात हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. प्रगत देशात एक लाख लोकसंख्येत १५६ लोकांचे हृदयविकाराने निधन होते. हे प्रमाण भारतात साडेचार हजार आहे. हे चिंताजनक असून साक्षरतेचा अभाव, उपचारांची कमतरता, प्रथमोपचार करण्याची उदासीनता अशी अनेक कारणे आहेत.

याबाबतची जागृती करण्याचा निर्णय भारतीय भूलशास्त्र संघटनेने घेतला. त्यानुसार मंगळवारी शहरातील दहा ठिकाणी प्रथमोपचार कसे करावेत, याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. कद्दू यांनी सांगितले. यावेळी डॉ. किरण भिंगार्डे, डॉ. अरुणा चौगुले, डॉ. शीतल देसाई उपस्थित होते.

या ठिकाणी दिले जाणारे प्रशिक्षण

सकाळी ७ ते ७.३० - शिवाजी विद्यापीठ योगासन वर्ग
सकाळी ७ ते ८ - ए. बी. एस. जिम सयाजी हॉटेल
सकाळी ८ ते ९ - शांतिनिकेतन विद्यालय
सकाळी १०.३० ते दुपारी एक - स. म. लोहिया महाविद्यालय
सकाळी १० ते ११.३० - सीपीआर
दुपारी १२ ते २ - न्यू हायस्कूल, पेटाळा
सायंकाळी ४ ते ५.३० - डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कदमवाडी
दुपारी ३ ते ५ - संस्कार शाळा, कदमवाडी
सायंकाळी ४ ते ५ - अस्टर आधार हॉस्पिटल व अलंकार हॉल, पोलीस मैदान
सायंकाळी ७ ते ८ - गोल्ड जिम, कोल्हापूर.
 

 

Web Title: Kolhapur: Ignorance organizations will give first aid lesson: Anjali Kadoo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.