कोल्हापूर : विमानतळाबाबतची पर्यावरण सुनावणी सप्टेंबरमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:17 AM2018-08-27T11:17:15+5:302018-08-27T11:19:04+5:30

भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे कोल्हापूर विमानतळ येथे विविध बांधकामे केली जाणार आहेत. त्याबाबतची पर्यावरणविषयक सुनावणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयातर्फे विमानतळ येथे दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.

Kolhapur: Environmental hearing about the airport in September | कोल्हापूर : विमानतळाबाबतची पर्यावरण सुनावणी सप्टेंबरमध्ये

कोल्हापूर : विमानतळाबाबतची पर्यावरण सुनावणी सप्टेंबरमध्ये

ठळक मुद्देविमानतळाबाबतची पर्यावरण सुनावणी सप्टेंबरमध्येसूचना, आक्षेप तोंडी अथवा लेखी स्वरूपात पाठवा

कोल्हापूर : भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे कोल्हापूरविमानतळ येथे विविध बांधकामे केली जाणार आहेत. त्याबाबतची पर्यावरणविषयक सुनावणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयातर्फे विमानतळ येथे दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.

विमानतळ येथे प्राधिकरणातर्फे ब्लास्ट पॅड, आरईएसए, टॅक्सीवे, एप्रन, जीएसई क्षेत्र, आयसोलेशन वे, नवीन डोमेस्टिक टर्मिनल बिल्डिंगचे बांधकाम, एटीसी टॉवर, तांत्रिक ब्लॉक-कम फायर स्टेशनचे बांधकाम, धावपट्टीचे विस्तारीकरण प्रकल्पाचा प्रस्ताव प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पर्यावरणविषयक जाहीर सुनावणीसाठी प्राप्त झाला आहे. त्यानुसार सुनावणी होणार आहे.

या प्रकल्पाच्या परिसरातील रहिवासी, प्रकल्पामुळे विस्थापित आणि प्रभावित होणारे रहिवासी, पर्यावरणाविषयी कामकाज करणाऱ्या संस्थांच्या सूचना, आक्षेप असतील, तर त्या तोंडी अथवा लेखी स्वरूपात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तीस दिवसांत पाठवाव्यात, असे आवाहन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांनी प्रसिद्ध केली आहे.

विमानसेवा नियमित

जुलै-आॅगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यांत काही दिवस तांत्रिक कारणामुळे स्थगित झालेली मुंबई-कोल्हापूर विमानसेवा एअर डेक्कन कंपनीकडून आता नियमितपणे सुरू आहे. रविवारी विमानफेरी पूर्ण झाली.
 

 

Web Title: Kolhapur: Environmental hearing about the airport in September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.