कोल्हापूर :प्राचार्यास धक्काबुक्की करणाऱ्या फरार संशयितास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 06:38 PM2018-09-10T18:38:35+5:302018-09-10T18:39:09+5:30

Kolhapur: The arrest of the absconding suspect who is pushing the press arrested | कोल्हापूर :प्राचार्यास धक्काबुक्की करणाऱ्या फरार संशयितास अटक

कोल्हापूर :प्राचार्यास धक्काबुक्की करणाऱ्या फरार संशयितास अटक

Next
ठळक मुद्देप्राचार्यास धक्काबुक्की करणाऱ्या फरार संशयितास अटकन्यायालयाच्या आवारातून घेतले ताब्यात

कोल्हापूर : येथील राजाराम कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य वसंत बाबूराव हेळवी (वय ५४) यांना कॉलेजमध्ये घुसून धक्काबुक्की व शिवीगाळ करणाऱ्या संशयितास मुंबई येथे पोलिसांनी सोमवारी अटक केली. संशयित ऋषिकेश मोहन गाडगीळ (वय ४०, रा. टिंबर मार्केट) असे त्याचे नाव आहे.

अधिक माहिती अशी, राजाराम कॉलेजमध्ये एका महिला प्राध्यापकाचा कॉलेज प्रशासनाबरोबर वाद होता. त्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी एप्रिल २०१६ मध्ये संशयित गाडगीळ कॉलेजमध्ये गेला होता. प्रतीक्षा कक्षामध्ये न थांबता तो थेट प्राचार्य वसंत हेळवी यांच्या कार्यालयात घुसला.

हेळवी यांनी त्याला बाहेर जाण्यास सांगताच त्याने अरेरावीची भाषा वापरत धक्काबुक्की व शिवीगाळ केली. यावेळी ‘तू कॉलेजच्या बाहेर ये, तुला सोडत नाही’ अशी धमकी देऊन तो निघूून गेला होता. हेळवी यांनी याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल तक्रार दिली होती.

गुन्हा दाखल झाल्यापासून अनेकवेळा पोलिसांनी गाडगीळचा शोध घेतला, मात्र तो मिळून येत नव्हता. तो मुंबईत न्यायालयीन कामकाजासाठी गेला असल्याचे राजारामपुरी पोलिसांना समजले. त्यांनी मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय पवार यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. पवार यांनी त्याला न्यायालयाच्या आवारातून ताब्यात घेतले. त्याला आणण्यासाठी राजारामपुरीचे पथक मुंबईला रवाना झाले आहे.
 

 

Web Title: Kolhapur: The arrest of the absconding suspect who is pushing the press arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.