कोल्हापूर : जिल्हा बॅँक कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के बोनस तर संस्थांना ८ टक्के लाभांश : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 12:00 PM2018-04-05T12:00:10+5:302018-04-05T12:00:10+5:30

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला ५७.५६ कोटींचा ढोबळ नफा झाला असून कर्मचाऱ्यांना तब्बल बारा वर्षांनंतर ८.३३ टक्के लाभांश दिला जाणार आहे. त्याचबरोबर संलग्न संस्थांनाही ८ टक्के लाभांश देणार असल्याची माहिती बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Kolhapur: 8.33 percent bonus for district bank employees and 8 percent dividend to the institutions: Hasan Mushrif | कोल्हापूर : जिल्हा बॅँक कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के बोनस तर संस्थांना ८ टक्के लाभांश : हसन मुश्रीफ

जिल्हा बॅँकेला ५७.५६ कोटी नफा झाल्याबद्दल अध्यक्ष हसन मुश्रीफ यांचा सत्कार कर्मचारी व संचालकांच्यावतीने करण्यात आला. यावेळी असिफ फरास, भैया माने, संतोष पाटील, संजय मंडलिक, पी. जी. शिंदे, निवेदिता माने, उदयानी साळुंखे, बाबासाहेब पाटील, आर. के. पोवार, विलास गाताडे उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देकर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के बोनस तर संस्थांना ८ टक्के लाभांश : हसन मुश्रीफ ५७.५६ कोटी ढोबळ नफा, व्यवस्थापन खर्चातही कपात

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला ५७.५६ कोटींचा ढोबळ नफा झाला असून कर्मचाऱ्यांना तब्बल बारा वर्षांनंतर ८.३३ टक्के लाभांश दिला जाणार आहे. त्याचबरोबर संलग्न संस्थांनाही ८ टक्के लाभांश देणार असल्याची माहिती बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, आर्थिक वर्षात सहा हजार कोटींच्या ठेवी, शंभर कोटींच्या नफ्याचे उद्दिष्ट ठेवून काम केले, पण नोटाबंदीतील २५.२७ कोटींचे व्याज मिळाले नाही. साखर उद्योग अडचणीत आल्याने ठेवींवर परिणाम झाल्याने उद्दिष्ट गाठता आले नाही तरीही ४०५३ कोटींच्या ठेवी, ३०११ कोटींचे कर्जवाटप केले. त्यातून ५७.५६ कोटी ढोबळ नफा झाला आहे.

बॅँकेचा व्यवस्थापन खर्च कमी करण्यात यश आले असून २.१९ टक्के झाला. ‘सीआरएआर’ (भांडवल पर्याप्तता) १२.५५ टक्के राखण्यात यश आले आले. ढोबळ नफ्यातून तरतुदी करून यावर्षी कर्मचाºयांना ८.३३ टक्के बोनस देणार आहे. संस्थांना गेल्यावर्षी ४ टक्के लाभांश दिला होता यावर्षी ८ टक्के देणार आहे. यावेळी संचालक उपस्थित होते.

रोजंदारींना ‘प्रोबेशनल आॅर्डर’

शंभर कोटी नफा आणि व्यवस्थापन खर्च २ टक्क्यांच्या आत आला असता तर रोजंदारी व अनुकंपाखालील कर्मचाऱ्यांची कायम नेमणूक केली असती तरीही कर्मचाऱ्याबद्दल आमच्या मनात सहानुभूती आहे. संचालकांशी चर्चा करून त्यांना वर्ष-दोन वर्षाची ‘प्रोबेशनल आॅर्डर’ देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

‘शेड्युल्ड दर्जा’साठी ‘नाबार्ड’कडे पाठपुरावा

बॅँक सक्षम झाली असून ‘शेड्युल्ड दर्जा’ मिळविण्यासाठी ‘नाबार्ड’ला ठराव पाठविणार आहे. त्यामुळे मध्यस्थी बँक कमी होऊन थेट रिझर्व्ह बँकेशी व्यवहार करता येणार आहे. ग्राहकांना शासनाच्या अनुदानाच्या योजनांचा लाभ मिळू शकतो, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

खट्याळ संस्थांची वसुली

दहा संस्थांकडे ७८ कोटींची थकबाकी असून ढोल-ताशे वाजवूनही वसुली झालेली नाही. या खट्याळ संस्थांच्या संचालकांच्या मालमत्तांवर बोजा चढवून वसूल करणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

...तर दुप्पट बोनस

बॅँकेच्या १८३ शाखा नफ्यात असून केवळ ८ शाखा तोट्यात आहेत. दीर्घकाळ थकबाकी असलेल्या १७ संस्थांची थकबाकी वसूल झाली आहे. कर्मचारी, संचालकांच्या प्रयत्नांमुळे बॅँक सक्षम झाली असून शंभर कोटी नफा झाला तर कर्मचाऱ्यांना ८.३३ का दुप्पट बोनस देऊ, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

हे करणार-

  1. ‘सीबीएस’ प्रणाली
  2. कोल्हापूर, इचलकरंजी येथे ‘ई-लॉबी’कार्यरत करणार
  3. सक्षम विकास संस्थांच्या माध्यमातून ‘मायक्रो-एटीएम’ सेवा
  4. अपात्र ११२ कोटींचा विषय निकालात काढणे
  5. राष्यीकृत, खासगी बॅँकांप्रमाणे कर्जपुरवठा, शहरातील ग्राहक केंद्रबिंदू
  6. ठिबकला जास्तीत जास्त कर्जपुरवठा
  7. सर्व शाखा नफ्यात आणणार
  8. व्यक्तिगत अपघात विमा योजना

 

दृष्टिक्षेपात बँकेची भरारी-

तपशील         मार्च २०१७              मार्च २०१८
भागभांडवल  १६५.४६ कोटी          १७६.२३ कोटी
ठेवी               ३६३९.४३ कोटी       ४०५३.३७ कोटी
कर्जे वाटप     २५४७.२० कोटी      ३०११.०५ कोटी
ढोबळ नफा   १२.४६ कोटी              ५७.५६ कोटी
व्यव. खर्च       २.३८ टक्के             २.१९ टक्के
सीआरएआर    १०.७० टक्के         १२.५५ टक्के

 

 

Web Title: Kolhapur: 8.33 percent bonus for district bank employees and 8 percent dividend to the institutions: Hasan Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.