जयसिंगपुरात स्वच्छता अ‍ॅप ठरले कूचकामी- अ‍ॅप सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 11:13 PM2019-03-30T23:13:24+5:302019-03-30T23:16:05+5:30

गेल्या चार महिन्यांपासून जयसिंगपूर नगरपालिकेचा स्वच्छता अ‍ॅप बंदच आहे. त्यामुळे आनलाईन तक्रारींचा निपटारा होत नसल्याचे चित्र शहरात दिसत आहे. तांत्रिक कारणांमुळे अ‍ॅपवरील तक्रारी दिसत नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत असलेतरी स्वच्छता

Jaysingpur cleanliness app has begun to launch an inexpensive app | जयसिंगपुरात स्वच्छता अ‍ॅप ठरले कूचकामी- अ‍ॅप सुरू करण्याची मागणी

जयसिंगपुरात स्वच्छता अ‍ॅप ठरले कूचकामी- अ‍ॅप सुरू करण्याची मागणी

Next
ठळक मुद्देआनलाईन तक्रारींचा निपटारा नाही : शहरात स्वच्छतेचा उडतोय बोजवारा;

संदीप बावचे ।
जयसिंगपूर : गेल्या चार महिन्यांपासून जयसिंगपूर नगरपालिकेचा स्वच्छता अ‍ॅप बंदच आहे. त्यामुळे आनलाईन तक्रारींचा निपटारा होत नसल्याचे चित्र शहरात दिसत आहे. तांत्रिक कारणांमुळे अ‍ॅपवरील तक्रारी दिसत नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत असलेतरी स्वच्छता अ‍ॅप बंद असल्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा फोल ठरत आहेत. शहर स्वच्छतेसाठी स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत सुरु करण्यात आलेल्या या अ‍ॅपची ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी अवस्था बनली आहे.

स्वच्छतेबाबत नागरिकांच्या तक्रारी सहजरीत्या नोंदविता याव्यात, यासाठी डिजिटल माध्यम म्हणून स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत स्वच्छता अ‍ॅपची सव्वा वर्षापूर्वी जयसिंगपूर पालिकेने सुरुवात केली होती. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत स्वच्छता स्पर्धा आयोजित करून वेगवेगळ्या निकषाच्या आधारे पालिकांना मानांकन दिले जाते. स्वच्छता गुणवत्तेसाठी जयसिंगपूर शहराने सहभाग नोंदवून पालिकेकडून स्वच्छता अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यासाठी जनजागृती केली होती. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत या अ‍ॅपचा वापर नागरिकांनी चांगल्या पध्दतीने केला होता.

दरम्यान, डिसेंबर २०१८ पासून तांत्रिक अडचणींमुळे स्वच्छता अ‍ॅपमध्ये बिघाड निर्माण झाला आहे. नागरिकांकडून स्वच्छतेबाबत तक्रारी डाऊनलोड करून पाठविल्या जात असल्या तरी नगरपालिकेच्या इंजिनिअर्स अ‍ॅपमध्ये या तक्रारी दिसत नाहीत. त्यामुळे हे अ‍ॅप बिनकामाचे ठरले आहे. गेल्या चार महिन्यांपासून स्वच्छता अ‍ॅप बंद असल्याचे नगरपालिकेतून सांगण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचा निकाल देखील नुकताच लागला आहे. अ‍ॅप बंद असल्यामुळे त्याचे गुणही पालिकेला मिळालेले नाहीत. त्यामुळे किमान दैनंदिन तक्रारीसाठी हे अ‍ॅप सुरू करावे, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.

अ‍ॅपचा फायदा
शहरातील कुठल्याही भागात कचरा दिसल्यास नागरिकांना तक्रार करता येते. याशिवाय घंटागाडी आली नाही, मृत जनावरांची विल्हेवाट लावणे, सार्वजनिक शौचालयात पाणी नाही, कचऱ्याचे ढीग, गटारी तुंबल्या यासह विविध तक्रारी याबाबतचे छायाचित्र काढून स्वच्छता अ‍ॅपवर टाकल्यास पालिकेकडून त्यावर कारवाई करणे हा उद्देश आहे. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे हा स्वच्छता अ‍ॅप बिनकामाचा ठरला आहे.

तांत्रिक अडचण दूर करण्याची मागणी
स्वच्छता अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यासाठी सव्वा वर्षापूर्वी जनजागृती करण्यात आली होती. मात्र, ज्यांना अ‍ॅपबद्दल माहिती नाही, ते नागरिक थेट तोंडी किंवा लेखी तक्रार देत आहेत. त्यांच्या तक्रारीचे निरसन केले जात आहे. डिजिटल माध्यमातून तक्रारीचा हा उपक्रम फोल ठरला आहे. शहर स्वच्छ ठेवण्याचा सोपा उपाय अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना मिळाला होता. मात्र, अ‍ॅपच बंद असल्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण उद्देश असफल ठरत आहे. त्यामुळे ही तांत्रिक अडचण दूर करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Web Title: Jaysingpur cleanliness app has begun to launch an inexpensive app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.