‘एक्झिट पोल’ने घालमेल : लोकसभा निकाल -: उरले दोनच दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:54 AM2019-05-21T00:54:43+5:302019-05-21T01:00:49+5:30

लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडला असून, मतमोजणी गुरुवारी (दि. २३) होत आहे. मतमोजणीचा काउंटडाऊन सुरू असतानाच विविध वाहिन्यांनी आपले एक्झिट पोल जाहीर करून देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली असली

Integrate with Exit Poll: Lok Sabha Result: - The remaining two days | ‘एक्झिट पोल’ने घालमेल : लोकसभा निकाल -: उरले दोनच दिवस

‘एक्झिट पोल’ने घालमेल : लोकसभा निकाल -: उरले दोनच दिवस

Next
ठळक मुद्देनिकालानंतर मिरवणुकींना बंदी -पोलीस अधीक्षक : हुल्लडबाजांवर कारवाई ; बंदोबस्तास पाच हजार पोलिसांची फौज कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विजयी उमेदवारांना शहरासह गावोगावी मिरवणुका काढण्यास बंदी घातली आहे. तसेच हुल्लडबाजी कमतमोजणीचा काउंटडाऊन सुरू -मतमोजणीसाठीचा ‘१९५०’ टोल फ्री क्रमांक कार्यान्वित

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडला असून, मतमोजणी गुरुवारी (दि. २३) होत आहे. मतमोजणीचा काउंटडाऊन सुरू असतानाच विविध वाहिन्यांनी आपले एक्झिट पोल जाहीर करून देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली असली, तरी कार्यकर्त्यांची घालमेल वाढली आहे.

कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांत २३ एप्रिलला मतदान झाले होते. दोन्ही मतदारसंघांत सरासरी ७० टक्के मतदान झाले आहे. मतदान ते मतमोजणी हा एक महिन्याचा कालावधी आहे. त्यामुळे गेले महिनाभर उमेदवारांसह कार्यकर्त्यांत धाक्धूक सुरू आहे. जसा मतमोजणीचा दिवस जवळ येईल, तशी ती वाढतच जात आहे. लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान रविवारी सायंकाळी सहा वाजता संपले आणि दुसऱ्या मिनिटापासून विविध वाहिन्यांचे एक्झिट पोलचे आकडे धडाधड बाहेर पडू लागले. कोल्हापूर आणि हातकणंगलेचा निकाल काय? याबाबत काही अंदाज वर्तविला जाईल का? याकडे सर्वांच्या नजरा होत्या. महाराष्टÑात शिवसेना-भाजप आघाडीला ३४ ते ४० जागा मिळतील, तर कॉँग्रेस-राष्टÑवादीला ८ ते १४ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला. ‘कोल्हापूर’मध्ये राष्टÑवादीचे धनंजय महाडिक व शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक यांच्यात जोरदार टक्कर पाहावयास मिळाली. शिवसेनेच्या १७ जागेत प्रा. मंडलिक आहेत की राष्टवादीच्या ९ जागेत महाडिक यांचा समावेश आहे, याची उत्सुकता मात्र कायम आहे.

‘हातकणंगले’मध्ये ‘स्वाभिमानी’चे राजू शेट्टी व शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्यात निकराची लढत झाली. एक्झिट पोलमध्ये एक जागा ‘स्वाभिमानी’ला दाखविल्याने शेट्टी समर्थकांत उत्साह आहे; पण सांगलीमध्ये भाजपचे संजयकाका पाटील, ‘वंचित’चे गोपीचंद पडळकर व ‘स्वाभिमानी’ आघाडीचे विशाल पाटील यांच्यात काटाजोड लढत झाली. येथे विशाल पाटील बाजी मारू शकतात, अशी चर्चा आहे. त्यामुळे एक्झिट पोलमध्ये ‘स्वाभिमानी’ची जागा ‘हातकणंगले’ची की ‘सांगली’ची याविषयी दिवसभर चर्चा सुरू होती.

निकालानंतर मिरवणुकींना बंदी -पोलीस अधीक्षक : हुल्लडबाजांवर कारवाई ; बंदोबस्तास पाच हजार पोलिसांची फौज
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विजयी उमेदवारांना शहरासह गावोगावी मिरवणुका काढण्यास बंदी घातली आहे. तसेच हुल्लडबाजी करणाºया कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कार्यकर्त्यांनी निकालानंतर कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची खबरदारी घ्यावी. कायद्याचे पालन न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिला आहे.

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्यात पाच हजार पोलीस व राज्य राखीव दलाचे जवान लक्ष ठेवून असतील. मतमोजणी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. साध्या वेशातही पोलिसांची पथके या परिसरात लक्ष ठेवून असणार आहेत.

तर कडक कारवाई
हुल्लडबाजी करणाºया कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलिसांना दिले आहेत. नागरिकांची कोणत्याही प्रकारे हेळसांड होऊ नये, यासाठी मतमोजणी परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. पहाटे सहा ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या परिसरात मी स्वत: लक्ष ठेवून असणार आहे, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.

वाहनांना प्रवेश बंदी : मतमोजणी परिसरातील मार्गावर बंदोबस्तात असलेली पोलीस वाहने, अग्निशामक दल, शासकीय वाहने, अ‍ॅम्ब्युलन्स, तसेच जिल्हा निवडणूक अधिकाºयांनी परवानगी दिलेली पासधारक वाहने वगळून सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. गुरुवारी (दि. २३ मे) पहाटे ५ पासून मतमोजणी पूर्ण होईपर्यंत प्रवेश बंदी करण्यात येणार आहे.
अधिकाºयांना सूचना : मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताची आढावा बैठक पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी सोमवारी मुख्यालयात घेतली. शहरातील पाचही पोलीस ठाण्यांसह इचलकरंजी, शहापूर, जयसिंगपूर, शिरोळ, हातकणंगले, हुपरी, कागल, गडहिंग्लज, चंदगड, शाहूवाडी, पन्हाळा, कोडोली येथील पोलीस उपअधीक्षक, निरीक्षकांकडून बंदोबस्ताचा आढावा घेतला.

मतमोजणीसाठीचा ‘१९५०’ टोल फ्री क्रमांक कार्यान्वित
लोकसभा निवडणुकीची कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांची मतमोजणी गुरुवारी (दि. २३) होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मतमोजणीच्या अनुषंगाने आवश्यक माहिती व इतर शंकांचे निरसन करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबई यांच्या कार्यालयीन स्तरावर संपर्क केंद्र स्थापन करण्यात आले.

या केंद्रांसाठी ‘१९५०’ हा टोल फ्री क्रमांक सोमवारपासून कार्यान्वित करण्यात आला. तरी नागरिकांनी मतमोजणीच्या अनुषंगाने आवश्यक माहिती व इतर शंकांचे निरसन करून घेण्यासाठी या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.


तांत्रिक अडचणीवेळी ‘व्हीव्हीपॅट’ ग्राह्य धरणार
चाळीस ‘सीसीटीव्हीं’ची केंद्रांवर नजर
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सुरुवातीला ‘ईव्हीएम’ची मोजणी होणार आहे. एखाद्या यंत्रामध्ये काही तांत्रिक अडचण निदर्शनास आल्यास ते बाजूला ठेवले जाणार आहे. ‘ईव्हीएम’ मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तांत्रिक अडचण असलेल्या यंत्राच्या ‘व्हीव्हीपॅट’च्या चिठ्ठ्या मोजून ते मतदान ग्राह्य धरले जाईल. जिल्हा निवडणूक विभागाकडून गुरुवारी (दि. २३) होणाऱ्या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मतमोजणी केंद्रांवर ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार असून, सुरक्षेसाठी या केंद्रांभोवती पोलीस दलाची तीन कडी सज्ज असणार आहेत.
कोल्हापूर मतदारसंघाची मतमोजणी रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल येथे व हातकणंगले मतदारसंघाची मोजणी राजाराम तलाव येथील शासकीय गोदाम येथे होणार आहे. दोन्ही ठिकाणी मिळून १२ विधानसभा मतदारसंघांसाठी २४० टेबले मांडण्यात आली असून, प्रत्येकी दोन याप्रमाणे २४ ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉँग रूमपासून मतमोजणी केंद्रापर्यंत दोन्हीकडे मिळून १२ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मतमोजणीच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुख्य प्रवेशद्वारावर पहिले कडे राहणार असून, ही जबाबदारी महाराष्ट पोलिसांवर असणार आहे.

Web Title: Integrate with Exit Poll: Lok Sabha Result: - The remaining two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.