हिटलरशाही प्रवृत्ती वाढतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:43 AM2017-09-12T00:43:02+5:302017-09-12T00:43:02+5:30

Hitler's regime increases | हिटलरशाही प्रवृत्ती वाढतेय

हिटलरशाही प्रवृत्ती वाढतेय

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
राधानगरी : देशात ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार, समाजसुधारकांची हत्या होत आहेत, तर त्याचवेळी दुसरीकडे ब्राह्मण असल्याचे सांगत स्वयंपाक करून फसवणूक केल्यासारखे गुन्हे दाखल होत आहेत. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराने चाललेल्या देशात जातियवादाला खतपाणी घालत आहे. त्यातून एकाधिकारशाही लादणारी हिटलरशाही पुन्हा रुजत असल्याचे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. राधानगरी येथील रेवताबाई एकावडे ट्रस्टच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी डॉ. व्ही. टी. पाटील फौंडेशन, स्वयंसिद्धा कोल्हापूर, लक्ष्मीकांत विलासराव हंडे, गोविंद चौगले, रामचंद्र चौगले, संजय तिरवडे, विक्रम वागरे यांच्यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाºया व्यक्तींना खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
यावेळी खासदार राजू शेट्टी म्हणाले, आपले विचार समाजावर लादणारी हिटलरशाही पुन्हा मूळ धरू लागली आहे. आपल्या देशात व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. प्रत्येक माणूस वेगवेगळा आहे. सर्वांनी एकाच विचाराने चालणे शक्य नाही. आपले विचार दुसºयावर लादणारी हिटलरशाही वृत्ती जास्त काळ टिकत नाहीे.
यावेळी प्रा. डॉ. जालिंदर पाटील, अजित पोवार, कांचनताई परुळेकर, रामचंद्र चौगले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ सभापती अभिजित तायशेटे, माजी सभापती सुप्रिया साळोखे, माया लिंग्रस, मालोजी जाधव, वासुदेव पाटील, प्रा. ऐश्वर्या पालकर, पूनम देसाई, डॉ. सुभाष इंगवले, अध्यक्ष प्रल्हाद एकावडे, लता एकावडे, आदी उपस्थित होते.

Web Title: Hitler's regime increases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.