गाडगीळ खुनातील संशयिताची प्रकृती बिघडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 05:56 PM2017-10-04T17:56:26+5:302017-10-04T18:01:08+5:30

पाचगाव (ता. करवीर) येथील धनंजय गाडगीळ खून प्रकरणातील संशयित आरोपी अक्षय जयसिंग कोंडेकर (वय २३, रा. सुतार गल्ली, पाचगाव) याचा बुधवारी सकाळी रक्तदाब कमी झाल्याने कारागृह प्रशासनाने त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. कोंडेकर याला येथे दाखल केल्याचे वृत्त समजताच त्याच्या समर्थकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केल्याने तणाव वाढला. लक्ष्मीपुरी पोलिसांनी पोलीस बंदोबस्त वाढविला.

Gadgil murder suspect's condition worsened | गाडगीळ खुनातील संशयिताची प्रकृती बिघडली

गाडगीळ खुनातील संशयिताची प्रकृती बिघडली

Next
ठळक मुद्देसीपीआर रुग्णालयात कारागृह प्रशासनाने केले दाखल पाचगावातील समर्थकांची रुग्णालयाबाहेर गर्दीखटल्याची न्यायालयात सुनावणी अंतिम टप्प्यात

कोल्हापूर,4  : पाचगाव (ता. करवीर) येथील धनंजय गाडगीळ खून प्रकरणातील संशयित आरोपी अक्षय जयसिंग कोंडेकर (वय २३, रा. सुतार गल्ली, पाचगाव) याचा बुधवारी सकाळी रक्तदाब कमी झाल्याने कारागृह प्रशासनाने त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. कोंडेकर याला येथे दाखल केल्याचे वृत्त समजताच त्याच्या समर्थकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केल्याने तणाव वाढला. लक्ष्मीपुरी पोलिसांनी पोलीस बंदोबस्त वाढविला.


पूर्ववैमनस्यातून डिसेंबर २०१३ मध्ये पाचगाव येथे धनंजय गाडगीळ याचा खून झाला होता. या खुनातील संशयित आरोपी अक्षय कोंडेकर चार वर्षांपासून बिंदू चौक कारागृहात बंदिस्त आहे. या खटल्याची न्यायालयात सुनावणी सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे.

बुधवारी सकाळी त्याचा रक्तदाब कमी झाला. त्यामुळे कारागृह प्रशासनाने त्याला तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. त्याला रुग्णालयात आणल्याचे समजताच पाचगावातील तरुणांनी या ठिकाणी गर्दी केली. तरुणांचा जमाव पाहून लक्ष्मीपुरी पोलिसांनी बंदोबस्त वाढविला.
 

 

Web Title: Gadgil murder suspect's condition worsened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.