प्रो-कबड्डीसाठी कोल्हापूरच्या चौघांची निवड

By सचिन भोसले | Published: August 14, 2023 07:38 PM2023-08-14T19:38:18+5:302023-08-14T19:38:33+5:30

कोल्हापूर : प्रो-कबड्डीच्या दहाव्या हंगामासाठी कोल्हापूरातील तेजस पाटील, ओंकार पाटील, आदित्य पोवार, दादासाहेब पुजारी या चौघांची विविध संघाकडून निवड ...

Four Kolhapur players selected for Pro Kabaddi | प्रो-कबड्डीसाठी कोल्हापूरच्या चौघांची निवड

प्रो-कबड्डीसाठी कोल्हापूरच्या चौघांची निवड

googlenewsNext

कोल्हापूर : प्रो-कबड्डीच्या दहाव्या हंगामासाठी कोल्हापूरातील तेजस पाटील, ओंकार पाटील, आदित्य पोवार, दादासाहेब पुजारी या चौघांची विविध संघाकडून निवड झाली.

सडोली (ता. करवीर) तील तेजस पाटील सह्याद्री क्रीडा मंडळाचा खेळाडू आहे. त्याला सप्टेंबरमध्ये होणाऱ्या लिलावानंतर संघाचे नाव कळणार आहे. तर इचलकरंजी जयहिंद मंडळाचा आदित्य पोवार हा बंगळूरू बुल्स संघातून खेळणार आहे. शिंगणापूर जिल्हा परिषद शाळेचा ओंकार पाटील याची तेलगू टायटन, तर शिरोलीच्या जय शिवराय मंडळाचा दादासाहेब पुजारी यांची पुणेरी पलटण संघात निवड झाली. 

हे तिन्ही खेळाडू प्रत्येकी वीस लाख रूपयांच्या बोलीवर कराररबद्ध झाले आहेत. हे सर्व कबड्डीपटू रावज ॲकॅडमीचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डाॅ. रमेश भेंडिगिरी, प्रशिक्षिका उमा भेंडिगिरी यांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण व प्रा. आण्णासाहेब गावडे आणि कबड्डीचे ज्येष्ठ मार्गदर्शक जिल्हा संघटनेचे महासचिव प्रा. संभाजी पाटील यांचे प्रोत्साहन या खेळाडूंना लाभले.

Web Title: Four Kolhapur players selected for Pro Kabaddi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.