कोल्हापुरात प्रथमच आकर्षक गोल बुबुळाच्या पालीची नोंद

By संदीप आडनाईक | Published: June 14, 2023 03:19 PM2023-06-14T15:19:10+5:302023-06-14T15:19:22+5:30

केरळ-तामीळनाडू येथून येणाऱ्या लाकडांच्या वाहतुकीसोबत 'टिंबर मार्केट' परीसरात स्थलांतर

First time record of attractive Round Iris Pal in Kolhapur | कोल्हापुरात प्रथमच आकर्षक गोल बुबुळाच्या पालीची नोंद

कोल्हापुरात प्रथमच आकर्षक गोल बुबुळाच्या पालीची नोंद

googlenewsNext

कोल्हापूर : येथील टिंबर मार्केट परिसरातून प्रथमच आकर्षक 'निमास्पीस' या प्रजातीच्या गोल बुबुळाच्या पालीचा आढळ शिवाजी विद्यापीठाच्या अक्षय खांडेकर आणि इतर संशोधकांनी शोधला आहे. यासंदर्भात 'निमास्पीस ग्रासीलीस' या गोल बुबुळाच्या पालीच्या आढळ क्षेत्राची व्याप्ती आणि पुनर्वर्णन करणारा शोधनिबंध 'झूटॅक्सा' या अंतराष्ट्रीय संशोधन पत्रिकेतून प्रकाशीत झाला आहे. 

या संशोधनात ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे आणि ईशान अगरवाल तसेच शिवाजी विद्यापीठाचे प्राणीशास्त्राचे प्राध्यापक सुनिल गायकवाड आणि बीएनएचएसचे सौनक पाल यांचा सहभाग आहे. हा शोधनिबंध प्रा. सुनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यापीठात सुरु असलेल्या अक्षय खांडेकर यांच्या पीएचडी संशोधनाचा भाग आहे. 'निमास्पीस ग्रासीलीस' या गोल बुबुळाच्या पालीचा शोध १८७० मध्ये रिचर्ड बेडोम या ब्रिटीश संशोधकाने लावला. 

अंगावरील आकर्षक रंग आणि छोट्या आकारांवरुन या पाली लक्ष वेधून घेतात. त्यांच्या या आकर्षक रंगावरुनच त्यांचे नामकरण 'ग्रासीलीस' असे केले आहे. मूळ संशोधन पत्रिकेमधे ही पाल पालघाटच्या पर्वतांवर मिळाल्याचे नमूद केले आहे. पश्चिम घाटाला दक्षिण आणि मध्य अशा दोन भागांत खंडीत करणारा 'पालघाट गॅप' हा केरळ आणि तमिळनाडू या राज्यांत पसरलेला आहे. या संशोधनामध्ये ही पाल पालघाट गॅपच्या साधारणतः ७० कि.मी. परिघात आढळून आली. 'निमास्पीस ग्रासीलीस' ही पाल तिचा नैसर्गिक अधिवास सोडून इतरत्र आढळल्याची या संशोधनात ही पहिलीच नोंद आहे. टिंबर मार्केट परिसरात ही पाल प्रथमतः विवेक कुबेर यांच्या निदर्शनास आली. 

केरळ-तामीळनाडू येथून येणाऱ्या लाकडांच्या वाहतुकीसोबत या परीसरात ही पाल असावी. ''टिंबर मार्केट परिसरात ही पाल घरांच्या भिंती, लाकडांचे ओंडके आणि झाडांवरती आढळून आली.'' -विवेक कुबेर
 

 ''मानवी हस्तक्षेपामुळं नैसर्गिक अधिवासाच्या बाहेर होणाऱ्या प्राण्यांच्या प्रसाराचा त्या अधिवासावर आणि त्या प्राण्यांवर काय परीणाम होते हे तपासण्यासाठी दिर्घकालीन संशोधन करण्याची गरज आहे.'' - प्रा. सुनिल गायकवाड.

 'निमास्पीस ग्रासीलीस' ही पाल छोटा आकार आणि आकर्षक रंगामुळे स्पष्टपणे वेगळी ओळखता येते. या पालींचे नर माद्यांपेक्षा अधिक आकर्षक असतात. या पाली दिनचर असून दिवसा आपले भक्ष्य पकडण्यासाठी बाहेर पडतात.'' - अक्षय खांडेकर. 

Web Title: First time record of attractive Round Iris Pal in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.