काजू उत्पादन घटल्याने शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 11:41 PM2019-04-15T23:41:52+5:302019-04-15T23:41:57+5:30

कृष्णा सावंत । लोकमत न्यूज नेटवर्क आजरा : चालू वर्षी काजू उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला ...

Farmers hail from cashew production due to drop in production | काजू उत्पादन घटल्याने शेतकरी हवालदिल

काजू उत्पादन घटल्याने शेतकरी हवालदिल

Next

कृष्णा सावंत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आजरा : चालू वर्षी काजू उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आजरा व चंदगड तालुक्यांत नीचांकी घट झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
आजरा तालुक्यात काजू लागवड होते. यामधून शेतकऱ्यांना दरवर्षी ८००० मेट्रिक टन कमी-जास्त प्रमाणात काजू बियांचे उत्पादन मिळते. त्यामुळे तालुक्यातील काजू प्रक्रिया उद्योगाला मदत मिळते; परंतु यावर्षी उत्पादनच मोठ्या प्रमाणात घटल्याने प्रक्रिया उद्योगावरही परिणाम जाणवत आहे.
जानेवारी ते फेब्रुवारी हा कालावधी झाडांना मोहोर येण्याचा पहिला टप्पा आहे. मार्च ते एप्रिल हा दुसरा, तर मे ते जून हा तिसरा टप्पा आहे. पहिल्या टप्प्यात मोठे दव पडल्याने व प्रदूषित वातावरणामुळे मोहोरच गळून पडला. दुसºया टप्प्यातही मोहोर येण्याचे प्रमाण कमी आहे. या टप्प्यात केवळ ४० टक्के उत्पादन मिळण्याचे संकेत मिळत आहेत.
चालू हंगामात केवळ १६०० मेट्रिक टन उत्पादन मिळण्याची शक्यता कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष
शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतीनेच काजू उत्पादन घेत आहेत. काजू झाडाभोवती चर, खत, औषधे या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष होत असल्याचा परिणाम काजू घटवर होत असल्याचे कृषी पर्यवेक्षक मनोहर पाटील यांनी सांगितले.

घाटमाथ्यावर अधिक घट
कोकणात यावर्षी काजू उत्पादन चांगले आहे.
परंतु, घाटमाथ्यावरील
आजरा, चंदगड, गडहिंग्लज व बेळगाव परिसरातील गावामध्ये घटीचे प्रमाण अधिक आहे.

Web Title: Farmers hail from cashew production due to drop in production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.