जिल्ह्यातील ११ कारखान्यांची धुराडी थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 11:49 PM2018-03-18T23:49:20+5:302018-03-18T23:49:20+5:30

Dhuradi of 11 factories in the district stopped | जिल्ह्यातील ११ कारखान्यांची धुराडी थंडावली

जिल्ह्यातील ११ कारखान्यांची धुराडी थंडावली

Next

कोपार्डे : हंगाम सुरुवातीला ऊसदरावरून शेतकरी व कारखानदारांतील संघर्षानंतर एफआरपी अधिक १०० रुपये एकरकमी असा समझोता झाल्याने हंगाम सुरळीतपणे सुरू झाले. जिल्ह्यातील कारखान्यांचे गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असून, एक कोटी ३० लाख मे. टन उसाचे गाळप झाले. अजूनही १५ लाख मे. टन ऊस गाळपाविना शेतात उभा असल्याचा अंदाज शासकीय पातळीवर व्यक्त करण्यात येत आहे. आजअखेर जिल्ह्यातील ११ कारखान्यांचे गाळप हंगाम संपले असून, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कारखान्यांचे हंगाम संपणार आहेत.
जिल्ह्यातील २३ कारखान्यांपैकी २२ साखर कारखान्यांनी आपले गाळप हंगाम यशस्वीपणे घेतले आहेत. यात सहकारी १५, तर ७ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. १२.४५ सरासरी साखर उताऱ्यासह एक कोटी ३० लाख मे. टन उसाचे गाळप केले. हंगाम सुरुवातीला ऊसदरावरून कारखानदार व शेतकºयांत निर्माण झालेला संघर्ष एफआरपी अधिक १०० रुपये एकरकमी देण्याच्या यशस्वी तोडग्याने निकालात निघाला. पण हंगाम सुरू होताच साखरेचे दर ३७०० रुपये प्रतिक्विंटलवरून २९०० रुपयांपर्यंत घसरल्याने ऊसदर देण्यासाठी कारखानदारांना करावी लागणारी कसरत पाहता याहीवर्षी शेतकºयांना वेळेवर ऊस बिले मिळतात की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांची एफआरपी २७०० ते ३००० रुपयांच्या आसपास आहे. अखेर सर्वच शेतकºयांना पैसे देण्यासाठी हंगामाच्या सुरुवातीला ठरलेल्या फॉर्म्युल्याला बगल देत कारखानदारांनी प्रतिटन २५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला. उर्वरित रक्कम हंगाम संपल्यानंतर देण्याचे जाहीर केले. या निर्णयाला प्रथम शेतकरी संघटनांनी विरोध केला; पण साखरेचे घसरलेले दर व घटलेली मागणी पाहता नरमाईचे धोरण घेतल्याचेच चित्र दिसत आहे.
कारखानदारांना ऊसतोड मजूर, वाहतूक यंत्रणेच्या तुटवड्याने हंगाम संपेपर्यंत दैनंदिन गाळप उद्दिष्ट गाठताना कसरत करावी लागत होती. हंगाम संपताना तर शेतात ऊस असून ऊसतोड मजुरांअभावी उसाची उपलब्धता होत नसल्याने ‘नोकेन’सारख्या तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. यामुळे अडचणीत सापडलेल्या कारखान्यांना तीन शिफ्टऐवजी एकाच शिफ्टमध्ये गाळप करीत कार्यक्षेत्रातील ऊस संपविण्याची कसरत करावी लागेल.
अ. साखर कारखान्याचे नाव ऊस गाळप साखर साखर
नं. (मे.टन) (क्विंटल) उतारा
१ वारणा वारणानगर १०४१६०० १२६२१०० १२.१५
२ पंचगंगा इचलकरंजी ५१०३१० ६५९९४० १२.०७
३ कुंभी-कासारी, कुडित्रे ६२२०५० ८१०६३० १३.१२
४ दूधगंगा-वेदगंगा, बिद्री ५३८४८७ ६९३५५० १२.८७
५ भोगावती, परिते ४६६६६४ ५५८५० ११.९१
६ दत्त, शिरोळ १०५६५३० १३०३६५० १२.३४
७ गडहिंग्लज, हरळी २८७६९७ ३३२५६० ११.३०
८ छ. शाहू कागल ७४८७६५ ९१३२०० १२.३६
९ जवाहर, हुपरी १४७३३०० १८४४२५० १२.६५
१० छ. राजाराम, क. बावडा ४३८३८० ५३५७७० १२.६४
११ आजरा २८२३२२ ३५१०५१ १२.०२
१२ उदय गायकवाड (अथणी शुगर) ३१३२२९ ३७९५८० ११.७४
१३ स. मंडलिक, कागल ४८१९५८ ५९२८०० १२.५०
१४ शरद, नरंदे ६०७४९५ ७५४२०० १२.३८
१५ डी. वाय. पाटील, पळसंबे ३८८०८० ४७३७०० १२.२२
१६ अथणी शुगर (इंदिरा गांधी महिला) २८११२४ ३२४९०० ११.२० बंद
१७ दालमिया दत्त असुर्ले ८४५३९५ ११२३२०० १३.३३
१८ गुरुदत्त, टाकळी ६४४६४० ८४२६७० १२.६५
१९ इको केन (नलवडे शुगर्स) २२५४८३ २८२५८० ११.९२
२० हेमरस इंड. ५५९८३१ ७२४४१५ १२.७१
२१ महाडिक शुगर्स २२८५७१ २५७४८० ११.१७
२२ सेनापती संताजी घोरपडे ७४०७६ ८७०१६० १२.३६

Web Title: Dhuradi of 11 factories in the district stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.