सायबर दरोड्याने बॅँका धास्तावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 11:13 PM2018-09-05T23:13:40+5:302018-09-05T23:14:17+5:30

शाहूपुरी ट्रेझरी येथील स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या एटीएम मशीनचे पॉवर स्वीच बंद करून चोरट्यांनी पाच लाख रुपये काढले. प्रॉकसी स्वीच तयार करून कॉसमॉस बॅँकेला हॅकरनी ९४ कोटींना लुटले. एटीएम पिन विचारून फसवणूक होण्याचे प्रकार आता सर्रास

 Cyber-typed bank | सायबर दरोड्याने बॅँका धास्तावल्या

सायबर दरोड्याने बॅँका धास्तावल्या

Next

रमेश पाटील ।
कोल्हापूर : शाहूपुरी ट्रेझरी येथील स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या एटीएम मशीनचे पॉवर स्वीच बंद करून चोरट्यांनी पाच लाख रुपये काढले. प्रॉकसी स्वीच तयार करून कॉसमॉस बॅँकेला हॅकरनी ९४ कोटींना लुटले. एटीएम पिन विचारून फसवणूक होण्याचे प्रकार आता सर्रास होत आहेत. एटीएमवर अशा अधूनमधून पडणाऱ्या सायबर दरोड्याने बॅँका आता धास्तावल्या आहेत. बॅँकांच्या आयटी विभागाच्या पुढे या सायबर गुन्हेगारांचे ‘डोके’ चालते एवढीच प्रतिक्रिया बॅँक वर्तुळातून दिली जात आहे.

कॉसमॉस बॅँकेवर ११ व १३ आॅगस्टला सायबर दरोडा पडला. कॅनडासह २८ देशांतून केवळ दोन तासांत ७८ कोटी काढले गेले. त्याचवेळी देशांतील विविध शहरांमधील १३ आॅगस्टला १३ कोटी ९२ लाख रुपये हॅकरनी इतर खात्यावर वळविले. या घटनेला पंधरा-तीन आठवडे होतात तोपर्यंत कोल्हापुरात हॅकरनी नवीन युक्ती वापरून स्टेट बॅँकेच्या एटीएममधून मशीनचा स्वीच पॉवर बंद करून पाच लाख १० हजार रुपये काढले.

याबाबत कोल्हापुरातील एका राष्टÑीयीकृत बॅँकेच्या आयटी विभागातील अधिकारी यांनी काही सूचना केल्या. सूचनेनुसार को-आॅप. बॅँका, शेड्युल्ड दर्जाच्या बॅँकांबरोबरच राष्टÑीयीकृत बॅँकांनी इंटरनॅशनल ट्रॅँझॅक्शन ही सध्या सुरू असलेली सुविधा बंद करून, ग्राहकाने अशी सुविधा मागितली तरच त्याला ही सुविधा पुरवावी. इतरांसाठी मात्र ही सुविधा बंद ठेवावी. तसेच काही बनावट वेबसाईटवरून बॅँकेचे व्यवहार होतात. त्यामुळे बॅँकांनी दर आठवड्याला सिक्युरिटी सर्चमधून अपडेट घ्यावा. त्यामुळे बनावट वेबसाईट ओळखता येतील. एटीएमचा पिनकोड कोणाला सांगू नये, अथवा कोठेही लिहून ठेवू नये. बॅँका ग्राहकांना फोनवरून एटीएमची माहिती विचारत नाहीत. तसेच एटीएमचा पिन टाकत असताना एक हात पिनच्या वरती आडवा धरावा. जेणेकरून आपण पिन काय दिला हे इतरांना समजू नये. या सूचना ग्राहकांनी अमलात आणल्यास सायबर गुन्ह्याला काही प्रमाणात आळा बसेल, असे अधिकाºयांचे मत आहे.

बॅँकांनी एटीएम देखभाल खर्च परवडत नसल्यामुळे सिक्युरिटी गार्ड (सुरक्षा रक्षक) ठेवण्याचे बंद केले आहे. चोरट्यांनी जर एटीएम फोडले तर विमा कंपनी नुकसानभरपाई देते. या मानसिकतेने काही बॅँकांनी सुरक्षा रक्षक नेमलेले नाहीत. एकंदरीत संगणक तज्ज्ञ असणारे सायबर गुन्हेगार बॅँकांच्या पुढे आहेत. प्रत्येकवेळी नवनवीन युक्त्या वापरून सायबर दरोडा टाकला जातो. त्यामुळे सर्वांनीच सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

संगणक तज्ज्ञ असणारे सायबर गुन्हेगार बॅँकांच्या पुढे आहेत.
बॅँकांबरोबरच आता ग्राहकांनाही आॅनलाईन व्यवहार करताना सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

Web Title:  Cyber-typed bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.