२०१९ मध्ये काँग्रेसच सत्तेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 12:07 AM2018-04-09T00:07:28+5:302018-04-09T00:07:28+5:30

Congress in power in 2019 | २०१९ मध्ये काँग्रेसच सत्तेत

२०१९ मध्ये काँग्रेसच सत्तेत

Next


उचगाव : देशात बदलाचे वारे वाहू लागले असून, २०१९ मध्ये राष्टÑीय काँग्रेस पक्षच सत्तेवर असेल. कंजारभाट समाजाच्या उन्नतीसाठी आमदार सतेज पाटील यांनी कार्य केले आहे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
उजळाईवाडी येथे २७ गावांतील कंजारभाट समाजातील व्यक्तींसाठी दिलेल्या पाच एकर जागा स्मशानभूमीचा लोकार्पण सोहळा सरस्वती मंगल कार्यालय येथे पार पडला. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, सतेज पाटील यांनी एखादा विषय लावून धरला, तर तो तडीस गेल्याशिवाय सोडत नाही. कंजारभाट समाज हा भटकंती करणारा वंचित राहिलेला घटक आहे. त्यांच्या पिढ्यान्पिढ्यांची सोय व्हावी म्हणून सतेज पाटील यांनी स्मशानभूमीसाठी पाच एकर जागेची मागणी केली. त्या जागेला मंजुरी देण्याचे काम आपण केले. काँग्रेसने केलेली विकासकामे आजही लोकांच्या लक्षात आहेत.
आमदार सतेज पाटील म्हणाले, पूर्वीच्या काळात कंजारभाट समाजाला पोलीस वेठीस धरायचे, त्यांच्यावर चूक नसताना त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक मिळायची, हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून गृहराज्यमंत्री असताना या समाजाला न्याय देण्याची जबाबदारी पार पाडली. कंजारभाट समाजाची पूर्वीपासूनची दफनभूमीची पाच एकर जागा माजी महसूलमंत्री थोरात यांच्या माध्यमातून मिळवून दिली. हे पुण्याईचे काम काँग्रेसच्या माध्यमातून केल्याने ही जागा लोकार्पण करताना विशेष आनंद आहे.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती प्रतिमा पाटील, महापौर स्वाती यवलुजे, प्रदीप झांबरे, माजी जि. प. सदस्य शशिकांत खोत, काकासाहेब पाटील, संजय माने, राजू माने, सुभाष माने, बाबूराव हजारे, ग्रा. पं. सदस्य अजय पाटील, अलका कांबळे, मनोज मछले, जयराज भाट, संजय नवले, सावन नवले, विनोद मछले, मोहन मछले , सूरज बागडे, कृष्णा मछले, महेंद्र तमायचे, आदी उपस्थित होते.
फक्त भाजपचा सातबारा भरणे सुरू
बाळासाहेब थोरात हे महसूलमंत्री असताना त्यांनी आॅनलाइन सातबारा, महसूल विभागाचे क्रांतिकारक निर्णय घेतले. पण आताचे महसूलमंत्री हे फक्त भाजपचा सातबारा भरायचे काम करीत आहेत, अशी टीका पाटील यांनी केली.

Web Title: Congress in power in 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.